नदी हरवते आडवळणी

पणजीच्या अटल पुलावरून दूरवर विस्तारलेल्या मांडवीचे रूप अजूनही तजेलदार दिसते.
नदी हरवते आडवळणी
नदी हरवते आडवळणी Dainik Gomantak

कमरेवरी कळशी गे, कळशीन नदी हासे गे

खळखळून सांगे, बाये भागय तुजी तान गे

भागय तुजी तान बाये, भागय तुजी तान गे....

दीशी असलेले जवळचे नाते कौतुकाने मिरवण्याचे दिवस आता राहिलेत कुठे? एकेक करून आक्रसत जाणाऱ्या नद्यांच्या (River) प्रदेशात आता आम्ही अडकलो आहोत. उत्तरेकडून असो किंवा दक्षिणेकडून, नदीला लंघुनच गोव्यात प्रवेश होतो. डोळ्यांना सुखावणारे नद्यांचे निळे प्रवाह ओलांडताना आपल्याला त्या नदीच्या गर्भात आपणच पेरून ठेवलेल्या विध्वंसाची कल्पना किंचितही येत नाही. पणजीच्या अटल पुलावरून दूरवर विस्तारलेल्या मांडवीचे रूप अजूनही तजेलदार दिसते. तिचा मूळ झरा दूरच्या डोंगरावर अडवल्यामुळे तिच्यात साचून पसरत चाललेल्या दुर्धर खारटपणाचा ज्वर अजून तिच्या अंगावर उठलेला नाही. काँक्रिटच्या जंगलाचा (Concrete forest) हव्यास धरून जेव्हा पणजीच्या नागाळी नदीला आपण ‘सांतईनेझचा नाला’ बनवून टाकतो तेव्हा हजारो वर्षांच्या या धरतीवरच्या तिच्या अस्तित्वाचे अखेरचे विधी करून आपण तिचे तर्पणही करून टाकलेले असते.

गोव्यातली अशीच दुर्दैवी नदी म्हणजे सासष्टी मधली साळ नदी. वेर्णा इथं उगम पावून, दक्षिण गोव्यातली सुंदर गावे कवेत घेऊन, ती 35 किलोमीटर दूर असलेल्या निसर्गसुंदर बेतुल गावी समुद्राला जाऊन मिळते. बेतुलला पोहोचेपर्यंत सुमारे तीनशे चौरस किलोमीटर जमीन ती आपल्या पाण्याने भिजवते. काठावरून सुंदर दिसणारी ही नदीसुद्धा प्रदूषणाने ग्रस्त होऊन जर्जर झालेली आहे. तिच्याच सापडलेल्या मायक्रो प्लास्टिक अंशात रस्त्यावर झिजणाऱ्या टायरचे प्रमाण सर्वात अधिक आहे. गोव्याच्या ‘एनआयओ’, ‘ॲकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रीसर्च’ आणि वेल्लोर इथल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थांनी केलेल्या संशोधनातून तर निष्कर्ष आला आहे की गोव्याच्या खाण उद्योगाची संबंधित सिंथेटिक, प्लास्टिक उद्योगाशी संबंधित अल्कोहोल आणि विद्युत उपकरणांची संबंधित पोलियासेटलीनचे पोलिमर यांचा विनाशकारक अंश साळ नदीतून अनिर्बंधपणे वाहतो आहे. या निष्कर्षात साळ नदीत असलेल्या शिंपल्यांचा आणि माशांचा अभ्यास समाविष्ट होता

नदी हरवते आडवळणी
Ganesh Festival: एक समृद्ध वारसा अडगळीत जाताना

लक्षात घ्या, या नदीवर मासेमारी करणाऱ्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांनी या नदीत पकडलेले मासे गोमंतकीय खवय्ये, “वा, गावठी नुसते मरे!” अशी फर्मास दाद देत खात आहेत आणि साळ नदीचे दुर्दैव अशातऱ्हेने त्यांच्याही पोटात शिरकाव करते आहे. नदीमधल्या शिंपल्यामधून ‘मायक्रो प्लास्टिक’ प्रचंड प्रमाणात खाणाऱ्यांच्या पोटात जाते आहे. नदीच्या पाण्यात असलेल्या प्लास्टिक बाटल्या, पॅकेजिंग साहित्य, सूक्ष्म प्लास्टिक यांचे प्रमाण तर अतोनात आहे. नळाच्या पाण्यात मायक्रो प्लास्टिकचे विघातक अंश प्रमाणाबाहेर सापडल्याच्या बातमीनंतर एका महिन्यात हा अहवाल आता प्रसिद्ध होतो आहे. मात्र हा अहवाल मान्य नसल्याच्या अविर्भावात राज्य सरकारने ‘एनायओ’ला प्रश्न मात्र केला आहे, “केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने नदीच्या या संशोधनादरम्यान राज्य सरकारच्या सहकारासंबंधी विचारणा का केली नाही?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com