
Mahadayi River 20 मे 2023 या दिवशी मिरामार ते पणजीतील सांता मोनिका जेट्टीपर्यन्त सुमारे 7000 लोक एकत्र येऊन, 7 किलोमिटर लांबीची मानवी साखळी तयार करणार आहेत.
म्हदईच्या खोऱ्यातील पाणी वळवण्याच्या सुरु असलेला शेजारी राज्याच्या प्रयत्नामुळे गोव्यातील लोकांची तसेच निसर्गसंस्थेची जीवनरेखा असणार्या गोव्याच्या लाडक्या म्हादई नदीचे भवितव्य संकटात लोटले गेले आहे.
म्हादईसमोर उभ्या असलेल्या या संकटाकडे लक्ष वेधावे म्हणून अर्थविस्ट कलेक्टीव्ह, गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुप आणि सेव्ह म्हादई- सेव्ह गोवा फ्रंट यांच्या संयुक्त विद्यामाने हा सामुदायिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमातून लोकांना एकत्रित येऊन म्हादईचा इतिहास समजून घेण्याची संधीही लाभणार आहे.
म्हदई नदी ही राज्यातील लोकांचे पालन पोषण करणारे केवळ एक तत्व नाही तर तिच्या प्रवाहात स्थानिकांचा इतिहास आणि त्यांच्या ममत्वाची भावनाही मिसळलेल्या आहेत. गोव्याच्या भूमीवर असलेल्या अफाट जैवविविधतेची ती पोषण करते.
ही नदी वळवली तर हवामान बदलाबरोबर प्रदुषण, पाण्याची टंचाई, शेती असुरक्षिततता हे परिणाम देखील घडून येणार आहेत. पर्यावरणवादी राजेंद्र केरकर म्हणतात. ‘लहानपणापासून माझी संस्कृती समजून देण्यात माझा ओळख घडवून देण्यात या नदीचा मोठा वाटा आहे.
म्हादई एक अशी आई आहे जी घशाची तहानच नव्हे तर मनातील नकारात्मक विचार देखील पुसून टाकते.'
गोवा फांउंडेशनचे क्लॉड आल्वारीस हे लोकांना सावध करण्याच्या दृष्टीने सांगतात, ‘म्हदई नदी नष्ट करण्याच्या दृष्टीने काय योजना आखल्या जात आहेत ते गोव्यातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे.
जर नदी वळवण्याची योजना यशस्वी झाली तर ती आणखी एका नैसर्गिक नदीची केलेली अन्यायकारक कत्तल असेल. म्हादई केवळ गोव्याची नव्हे तर सबंध देशाची नदी आहे.
म्हणून केवळ गोमंतकीयांनीच नव्हे तर सबंध देशवासीयांनी या योजनेविरुद्ध निषेध नोंदवला पाहीजे.
निसर्गाला आपण त्याच्या मूळ स्वरुपात का राहू देत नाही? त्याच्यावर जुलूम जबरदस्ती करुन, त्याला कधीच पुर्वस्वरुप प्राप्त होऊ शकणार नाही अशातर्हेने खिळखिळे का करुन टाकतो?'
पणजीच्या मांडवी नदीच्या काठावर, 20 मे रोजी तयार झालेली मानवी साखळी ही म्हदईप्रती असलेल्या लोकांच्या जागरुकतेची खुण असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.