यशस्वी झालात,आता पुढचा विचार पक्का करा!

कोरोनामुळे परीक्षेला थोडा खीळ पडला होता, पण यंदा ती उणीव भासली नाही.
12th Board Exam
12th Board ExamDainik Gomantak

प्रा. रामदास केळकर

यंदाचा शालांत मंडळाचा बारावीचा निकाल भरघोस लागला. नित्याप्रमाणे मुलींनी यंदाही बाजी मारली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. यंदा दोन सत्रात 18 केंद्रे आणि 72 उपकेंद्रावर परीक्षा झाल्या. त्यात 18 हजार 201 विद्यार्थी बसले होते. कोरोनामुळे परीक्षेला थोडा खीळ पडला होता, पण यंदा ती उणीव भासली नाही. याबद्दल मंडळाचे, पर्यवेक्षकांचे अभिनंदन. दहावी नंतरचा महत्वाचा टप्पा म्हणून बारावीकडे पहिले जाते.

(This year's school board's result of class XII was overwhelming in goa)

12th Board Exam
लोणावळ्यातील ‘मम्मीज होमली फूड’

तुम्हाला गुण कितीही पडले तरी यापुढच्या टप्प्यात तीच सरासरी कायम ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा यशाने आपण हुरळून जातो. पुढच्या वर्षी आपली टक्केवारी घसरते, असे व्हायला देऊ नका. कारण परीक्षेतले गुण काहीवेळा तुम्हाला फसवू शकतात, असो.

आता पालक तसेच विद्यार्थी ह्यांनी पुढे काय करायचे? हा प्रश्न नेहमीप्रमाणे पडलेला असेल. त्यातल्या त्यात बारावी झालेल्या विद्यार्थ्याने आपला कल जवळ पास निश्चित केलेला असतो. तरीसुद्धा वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. कला वाणिज्य/व्होकेशनल विज्ञान असे आपल्याकडे विभाग उपलब्ध आहेत.

कला, विज्ञान आणि वाणिज्य / व्होकेशनल शाखेचे विद्यार्थी साधारणपणे पुढच्या वर्गाचा विचार करतात म्हणजे बी. ए., बी. कॉम शिक्षण घेण्यासाठी विज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांनी बी.एस्सी होण्याचा मार्ग निवडतात. परंतु सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी वेगळ्या वाटेने जायच्या पर्यायांचा विचारही करावा आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी स्थापत्यशास्त्र, होम सायन्स, अभिनय, वृत्तपत्रात बातमीदारी करणे, रेडिओ जॉकी बनण्यासाठी प्रयत्न करणे, संगीत क्षेत्राचा विचार करणे, फाईन आर्टस्‌कडे लक्ष देणे, कायदा हे सर्व पर्याय गोव्यात उपलब्ध आहेत.

शिवाय सामाजिक कार्यात रस असेल तर त्याचेही शिक्षण गोव्यात आहे. शेतीमध्ये रस असेल तर त्याचाही तुम्ही विचार करू शकता. आदरातिथ्याचा जरूर विचार करावा, हे असे क्षेत्र आहे. जिथे तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळू शकते. आता तर हेली ट्यूरिझमही गोव्यात थडकले आहे. सुदैवाने इथे केटरिंग शिकविणाऱ्या संस्था आहेत, त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता. अभियांत्रिकी करणाऱ्यांनी ‘स्टार्टअप’साठी प्रयत्नशील असावे. आपल्या कल्पना, इच्छा सत्यामध्ये आणता येईल, त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या, करिअर मार्गदर्शनासाठी वाचन करा. वृत्तपत्राप्रमाणेच इंटरनेटच्या माध्यमातून नेमकी माहिती मिळते, त्याचा लाभ घ्यावा.

इंटरनेटवर सुदैवाने बहुतेक सर्व संस्थांची संकेतस्थळ उपलब्ध असल्याने त्यांना प्रथम भेट द्या, संस्थांना भेट देऊन चौकशी करा आणि नंतरच प्रवेशाचा विचार करा. सर्व संस्था आपल्याकडे उत्तमोत्तम सोय आहेत, अशी जाहिरात करतात, पण प्रत्यक्ष काय आहे, याबाबत चौकशी करा. त्या संस्थेला मान्यता आहे कि नाही ? पुढे रोजगार न मिळाला तर निदान आपल्या पायावर उभे राहण्याची क्षमता आपण शिकत असलेल्या अभ्यासक्रमात असायला हवी. संगणकातील कित्येक कोर्सेसना मागणी आहे. यासाठी संगणक संस्थेला भेट देऊन त्याची माहिती घ्या. जणू काही आपण स्वाध्यायाची तयारी करतो आहोत, अशा पद्धतीने हे काम युद्ध पातळीवर करा. केवळ मित्र सांगतो म्हणून प्रवेश नक्की करण्याची चूक महागात पडू शकते.

12th Board Exam
करपली पोळी! देशात गहू निर्यातीचा मुद्दा बनला गहन

गोवा विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यास तमाम संलग्न कॉलेजेसची माहिती घर बसल्या तुम्हांला मिळू शकते. तोच नियम गोव्यात सर्व ठिकाणी असणाऱ्या आयटीआय केंद्रासह इतरांची वेबसाईट आहे. त्यानंतर पॉलिटेक्निक, फाईनआर्ट, डॉन बॉस्को पणजी, शेती विद्यालय केपे, सेंट झेवियर्स, धेम्पो, काकुलो, चौगुले कॉलेज तसेच तमाम सरकारी कॉलेजच्या संकेतस्थळांना जरूर भेट द्या. तेथील माहिती मिळवून नंतरच प्रवेशाचा निर्णय घ्या.

तुम्हांला नागरी सेवा, चार्टर्ड अकाऊंटन्ट, कॉलेजमध्ये अध्यापनात रस असेल तर आतापासूनच त्या तयारीला लागा. तुम्हांला नोकरी करायची आहे कि सेवा करायची हे एकदा पक्के करा व त्या त्या संदर्भातील शिक्षण घेण्याचा निर्णय घ्यावा. नेमकेपणाने विचार करून पालक, शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घ्यायला हरकत नाही.

राज्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी म्हापसा, फर्मागुढी, वेर्णा, फातोर्डा, शिरोडा अशा ठिकाणी महाविद्यालये आहेत. एनआयटी,आयआयटीची सुविधाही फर्मागुढी येथे आहे. बीटस् पिलानीसारखी संस्थाही गोव्यात असून तेथेही विविध शाखांतून अभियांत्रिकीचे शिक्षण मिळते. याशिवाय बीबीए, बीसीएचे शिक्षण राज्यात मिळते. वैद्यकीयमध्ये गोमेकॉबरोबरच आयुर्वेदिक, होमिपॅथिक शिक्षणाची सुविधा आहे. फार्मसी, नर्सिंग व इतर शाखांतूनही पदवी, पदविका घेण्याची सुविधा राज्यात उपलब्ध झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com