गोव्यातील 'मांगिरीश विद्यालयाची' 70 वर्षांची वाटचाल...

शापोरा नदीकाठी संपन्न निसर्गाच्या (Nature) सान्निध्यात वसलेली ही शाळा म्हणजेच आरोबा- शिरगाळ पेडणे (Pernem) येथील मांगिरीश विद्यालय.
गोव्यातील 'मांगिरीश विद्यालयाची' 70 वर्षांची वाटचाल...
गोव्यातील 'मांगिरीश विद्यालयाची' 70 वर्षांची वाटचाल... Dainik Gomantak

शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर (Student) संस्कार घडविणारे एक संस्काराचे मंदिर असते जिथे कलात्मक कौशल्ये विकसित होत असतात. शापोरा नदीकाठी संपन्न निसर्गाच्या (Nature) सान्निध्यात वसलेली ही शाळा म्हणजेच आरोबा- शिरगाळ पेडणे (Pernem) येथील मांगिरीश विद्यालय. "ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस" या उक्तीप्रमाणे या ज्ञानमंदिराचा पाया संस्था, हितचिंतक, ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने रचला गेला आहे. गोव्याच्या (Goa) स्वातंत्र्यापुर्वी 11 डिसेंबर 1952 रोजी मराठी प्राथमिक शाळेला सुरुवात झाली. यंदा शाळेला 69 वर्षे पूर्ण होऊन शाळा 70 वर्षांत पदार्पण करत आहे. लोकशक्तीच्या आधारावर बांधलेल्या या मूळ वास्तूत जून 1973 मध्ये मांगिरीश शिक्षण संस्थेचे, इंग्रजी माध्यमातून पाचवी ते सातवीचे तीन वर्ग सुरू झाले. 1977 मध्ये एस. एस. सी.ची  पहिली तुकडी परीक्षेला बसली. तेव्हा विद्यालयाची विद्यार्थीसंख्या 300 पेक्षा जास्त होती.

सुरुवातीच्या काळात सुप्रसिद्ध समाजसेवक कै. कृष्णा उर्फ गोपी नाईक हे अध्यक्ष तर कै. कृष्णा फडते हे उपाध्यक्ष होते. शिक्षण संस्थेचे सचिव श्री विनायक आरोलकर यांचेही शाळेसाठी योगदान फार मोठे राहिले. स्व. रामचंद्र खोर्जुवेकर, स्व. महादेव नाईक, स्व. मॅथ्यू रॉड्रिगीज, स्व. उमा नाईक, श्री. चंद्रकांत आराबेकर, विनायक शंकर आरोलकर या सर्वांनी तन- मन-धन घालून शाळा (School) उभी केली. सदस्य म्हणून कार्यरत असणारे श्री. शशिकांत पुनाजी यांची, 26 जानेवारी 1995 साली  मांगिरीश एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी व्यवस्थापन समितीने निवड केली. ऐन तिशीत लाभलेल्या या जबाबदारीत त्यांनी आभाळाएवढी कामगिरी बजावली. अध्यक्षपदी असताना श्री. शशिकांत पुनाजी यांनी शाळेच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी कितीतरी वेळा मंत्र्यांच्या पायऱ्या झिजवल्या. अनेक अडचणींना सामोरे जात मांगिरीश संस्थेने हायस्कूलच्या अस्तित्वाची लढाई लढली. संस्थेचे सदस्य, पालक-शिक्षक संघटना, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यानीही साथ दिली. हायस्कूलने विज्ञान प्रदर्शने, बालोत्सव, स्काऊट अँड गाईड रॅली, नाटक (Drama) सादरीकरण असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. खेळांमध्ये शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.

गोव्यातील 'मांगिरीश विद्यालयाची' 70 वर्षांची वाटचाल...
फुलपाखरांची गोष्ट

सन 1995 मध्ये श्री. शशिकांत पुनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेने सरकारी इमारत फंडातून मुळ इमारतीला नवे रूप दिले. 2001 पासून शाळेत संगणक शिक्षण (Computer Education) तर 2003 मध्ये संगीत वर्ग सुरू झाले. याच दरम्यान शाळेने, भविष्यात विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून पूर्व प्राथमिक विभाग सुरू केला. 2016 -17 यासाली शाळेचा प्रथमच 94 टक्के निकाल लागला. त्याच्यानंतर सलग 4 वर्षे 100 % निकाल लागला. हा मांगिरीशच्या वाटचालीतला आणखी एक यशाचा तुरा होता.

मुख्याध्यापक काॅज्मा दि मिनेझिस, डी.व्ही.धारवाडकर या सरानंतर मुख्याध्यापक राहिलेले लोबाद फारीया, इंदुमती वझे यांनी नव्या जोमाने शाळेच्या प्रगतीसाठी कंबर कसली. आणि आता प्रभारी मुख्याध्यापिका सौ. गौरी वेर्लेकर व शिक्षक-वर्ग मुलांच्या भवितव्यासाठी भरपूर कष्ट घेत आहे. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत वावरत आहेत. गरज पडल्यास त्यांच्या मदतीचा हात शाळेला लाभतो. शाळेचे व्यवस्थापक एकनाथ चोपडेकर, व्यवस्थापन समितीतील सदस्य, गजानन आराबेकर, रविंद्र पेडणेकर, रामचंद्र परांजपे, गजानन नाईक, मिलिंद वंस्कर यांचे सहकार्य तर असतेच.

आज मांगिरीश विद्यालय 70 वर्षात प्रवेश करीत आहे."उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी...नजरेत सदा नवी दिशा असावी..घरट्याचं काय? बांधता येईल केव्हाही!परंतु.. क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी...

- अलिशा गडेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com