करिअरसाठी परीक्षांशिवाय गत्‍यंतर नाहीच

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

रवर्षी मोठ्या संख्येने तरुण वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रातील त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देतात. यामध्ये गोव्यातून किती विद्यार्थी परीक्षा देतात? तर अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत.. 

रवर्षी मोठ्या संख्येने तरुण वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रातील त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा देतात. यामध्ये गोव्यातून किती विद्यार्थी परीक्षा देतात? तर अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत.. 

आम्हाला ठराविक क्षेत्रे किंवा व्यवसाय सोडल्यास इतर क्षेत्रे निवडणे अजूनही जोखमीचे वाटते. त्यात प्रत्येकाचा ‘सुशेगात’ व्यवहार, पदवी मिळवली की ‘सुटलो एकदाचे’ असे होते. (बहुतेक विद्यार्थ्याची हीच अवस्था असते). तो दिवसरात्रभर अभ्यास करणे, प्रत्येक विषयाची प्रत्येक माहिती लक्षात ठेवणे त्यात या परीक्षा एकदम कठीण असल्याने उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देत राहण्याइतपत त्राण आमच्या अंगात असत नाही. शिपाई किंवा कारकुनाची सरकारी नोकरी मिळाली की आम्ही खुश...यावर विचार करणे म्हणजे डोकेदुखी...आणि वरून परप्रांतीयांची गोव्यात मोठ्या पदांवर नियुक्ती होते अशा आमच्या तक्रारी...आपण कितीही नाकारले तरी हीच आमची वस्तुस्थिती आहे.

साधारणपणे नागरी परीक्षांची जाहिरात नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते, अर्ज प्रक्रियाही एव्हाना सुरू होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतात. २१ ते ३२ वयोगटातील (इतर मागावर्गीय आणि इतर गटातील व्यक्तींसाठी काही सवलतीही असतात) भारतीय नागरिक असलेली व्यक्ती ही परीक्षा देण्यास पात्र असते. 

वेगवेगळ्या क्षेत्रासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात आणि प्रत्येक परीक्षेचा वेगवेगळा निकष असतो. या परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय डाक सेवा अशा केंद्र सरकारच्या विविध २४ सेवांसाठी या परीक्षा घेतल्या जातात.
भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात भरतीसाठी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित केली जाते. साधारणपणे फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते. तसेच केंद्र सरकारच्या विविध संस्था व सेवांमध्ये वैद्यकीय पदवीधरांना भरती करण्यासाठी दरवर्षी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा (सीएमएसई) घेण्यात येतात. या परीक्षा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारतीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या नियमांनुसार घेतल्या जातात. त्यासोबत भारतातील बँकमध्ये अग्रगण्य मानली जाणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)मध्येही विविध पदांवर भरतीसाठी परीक्षा घेतल्या जातात. 
आपल्या आवडत्या क्षेत्रात मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी अशा अनेक परीक्षा आहेत. कुणी मार्गदर्शन करणारेही भेटत नाहीत. कारण, प्रत्येकाला याबद्दल माहीत असतेच असे नाही. पण, आजकाल इंटरनेटमुळे सगळीच माहिती सहजतेने उपलब्ध होते. या परीक्षा कठीण असतातच, पण अशा परीक्षांत उत्तीर्ण होण्यापेक्षा त्या परीक्षा कशा असतात हे पाहणेही तेवढेच महत्त्वपूर्ण असते.

संबंधित बातम्या