गोव्यापासून 2 तासांच्या अंतरावर रवींद्रनाथ टागोर समुद्रकिनारा: पाहा व्हिडिओ

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 मे 2021

कारवार हे कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. ते गोव्यापासून 2 तासच्या अंतरावर आहे. तर कारवारच्या बसस्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. इथं अरबी समुद्राच्या हलक्या लाटा सोनेरी रंगानी बीच धुवून घेतात, असं वाटतं.

भारताचे राष्ट्रीय गीत "जण गण मन" आणि  बांग्लाचे  राष्ट्रगीत "आमार शोनार बांग्ला" तसंच गीतांजलीसारखे महाकाव्य लिहिलेले, साहित्यातील नोबेल पुरस्कार प्राप्त रवींद्रनाथ टागोर(Rabindranath Tagore) यांची आज जयंती (Birth Anniversary)आहे. यानिमित्त जाणून घेऊया रवींद्र टागोर यांच्या नावानं असलेल्या बीचबद्दलची अधिक माहिती. (Rabindranath Tagore beach 2 hours away from Goa) 

कारवार हे कर्नाटक(karnataka) राज्यातील एक शहर आहे. ते गोव्यापासून(Goa) 2 तासच्या अंतरावर आहे. तर कारवारच्या(karwar beach) बसस्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. इथं अरबी समुद्राच्या हलक्या लाटा सोनेरी रंगानी बीच धुवून घेतात, असं वाटतं. सूर्यास्ताच्या वेळी, मऊ प्रकाशासह जमीन आणि पाणी एकत्र आल्याचा भासही होतो. रवींद्रनाथ टागोर यांच्यावर या समुद्रकिनार्‍याच्या नैसर्गिक सौंदर्याचा सखोल परिणाम झाला आहे. पण, शांतता आणि नयनरम्य किनाऱ्यावर काही सूर्यप्रकाशाच्या सेल्फी क्लिक करायच्या असतील, तर तुम्हाला तिथे जावे लागेल. मूळचे बंगालचे रवींद्रनाथ टागोर कर्नाटकला कसे गेले असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.

Goa Lockdown: गोवा सरकारची लॉकडाउनसाठी सकारात्मक भूमिका 

तर रवींद्रनाथ 22 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाकडे म्हणजेच सत्येंद्रनाथ टागोर यांच्याकडे राहत होते. त्यावेळी ते कारवार जिल्ह्याचे न्यायधीश होते. कारवार समुद्रकिनाऱ्याच्या सृष्टीसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली. जीवनातील वास्तवविषयी चिंतन करत त्यांनी 'प्रकृतीरप्रतिसोध' म्हणजेच निसर्गाचा बदल हे पहिले नाटक लिहिले. जरी रवींद्रनाथ आधीपासून साहित्यिक लिखाण करत होते,  तरी कारवारमधील निसर्गाशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याचा त्यांच्यावर तीव्र परिणाम झाला, जो त्याच्या नंतरच्या लेखनात दिसून आला आहे. रवींद्र टागोर बीच अनेक  गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.

गोवा सरकार उचलणार कोविड रुग्णांच्या ट्रीटमेंट खर्च 

रवींद्र टागोर बीच सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या समुद्रावर बोटीच्या प्रवासाचा किंवा वॉटर स्कूटरवर समुद्राच्या लाटाचा आनंद आपण घेऊ शकतो.  टागोर बीचवरील वॉरशिप संग्रहालयाला नक्की भेट द्या समुद्रकिनार्‍याजवळ सागरी संग्रहालय देखील आहे. जंगल लॉज आणि रिसॉर्ट्समध्ये राहण्याची सोय आहे. कारवारमध्ये असताना येथे स्थानिक रेस्टॉरंट्समध्ये दिलेला सीफूडची चव चाखायला पहिजे कारवारमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक रवींद्रनाथ टागोर समुद्रकिनारा, काली आणि अरबी समुद्राचा संगम बिंदू आहे. कारवारच्या समुद्र किनारा अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेत. वरशिप म्युझियमसह इतर अनेक पर्यटन स्थळ आहेत .

संबंधित बातम्या