जीवनात सहकार्य हवे!

sham gaokar
मंगळवार, 14 जुलै 2020

आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती मिळणाऱ्या मिळकतीवर घरसंसार चालविण्याचा खटाटोप करतो. महागाई या भस्मासुर एवढा माजलेला
आहे की, सुखाने जीवन जगणे व्यथित होऊन बसले आहे. महागाईचा फोफावणारा अक्राळविक्राळ चेहरा सध्यातरी आळाबंद आणणे शक्य नाही. त्यासाठी महागाईच्या युगात प्रत्येकाने बचतीचा फॉर्मुला वापरण्याची गरज आहे.

श्याम गांवकर

आता यशाची व्याख्या काय असावी, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते. मात्र एक गोष्ट शाश्वत सत्य आहे. ती म्हणजे यशस्वी लोक जीवनात हिऱ्यासारखे चमकतात. कारण हे लोक जीवनातील कृतीची विभागणी सोयीस्करपणे करून त्यानुसार मार्गक्रमण करतात. योग्य गोष्ट, योग्यवेळी योग्य मार्गाने योग्य वेळेला करण्याची कसब म्हणजेच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली होय.

मानवी जीवनात आनंदाला विशेष महत्व असते. प्रत्येकाला आपल्या खाजगी जीवनात आनंद हवा असतो, का असू नये. आनंदाच्या परिभाषाच वेगळ्या. जीवनात चैतन्य निर्माण करणारा आनंद हा आपल्या सोबती असावा, असे प्रत्येकाला वाटते. अशा आनंदाला शोधण्याची गरज भासता कामा नये. आपल्या दिनचर्येतून आणि आपल्या दैनंदिन कृतीतून तो मिळवावा. जीवनात विशेष महत्त्व असणाऱ्या आनंदाला शोधण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा जीवनात आनंदही राहून सर्व गोष्टी सोयीस्करपणे आपण कशा काय करू शकणार, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे किंवा असते असं मला वाटतं.
जीवनाला आनंदाचे वलय मिळवून देण्यासाठी जीवनाकडे प्रत्येकाने संकारात्मकरित्या पाहण्याची गरज काय? आणि भविष्यात आपण करू शकतो. याचा प्रांजळपणे विचार करायला हवा. जीवनाला यशस्वी बनविणे हे ज्याच्या त्याच्या हाती असते. आजच्या घडीला जगात अशक्य असे काही नाही, असे म्हणण्यात नवल वाटू नये. प्रत्येकाने जीवनात सफल होऊन आनंदी राहण्यासाठी निश्चित ध्येय ठरवून त्यामागे पळत राहण्याची गरज आहे. जीवनात प्रत्येकाला मनातील ध्येयापर्यंत पोचणे महत्त्वाचे असते. ध्येयाकडे मार्गक्रमण करतेवेळी वाटेवर मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घेण्याची संधी दवडता कामा नये. कारण कोणाच्या वळणावर आनंद मिळेल याची शाश्वती नसते, जिथे मिळेल त्या ठिकाणी त्याचा पुरेपूर उपभोग घेण्याची गरज असते. आजच्या गतिमान युगात समाजात वावरत असताना काही सामाजिक नीतिमूल्ये असताना काही सामाजिक नीतिमूल्ये असतात. सामाजिक रूढी आणि परंपरा असतात त्यांना ठेच पोचू न देता, निरंतर मार्गक्रमण करण्याची शैली जीवनात यश प्राप्त करून देणारी असते. समाजात वावरत असताना काही ठरावीक कौशल्याचे आपण पालन करण्याची गरज असते, असे केल्याने माणूस आनंदी राहतो. नकळत तो समाजातील इतर घटकांना आवडू लागतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक बाबी महत्त्वाच्या ठरत असतात. त्यांपैकी एक ज्ञान. ज्ञान आत्मसात करण्याच्या विविध तऱ्हा असतात अशा तऱ्हांचा किंवा प्रकारांचा प्रत्येकाने उपयोग करण्याची गरज आहे.
ज्ञानाचे परिवर्तन कृतीमध्ये करून माणूस मार्गक्रमण करत असतो. कृतीशिवाय ज्ञान शक्य आहे. असं मला नाही वाटत. माणसाने नेहमी कृतीवर जास्त विश्वास ठेवावा कारण भविष्यात येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कृतीद्वारे येत असते. त्यावर यश अवलंबून असते. आता यशाची व्याख्या काय असावी, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते. मात्र एक गोष्ट शाश्वत सत्य आहे. ती म्हणजे यशस्वी लोक जीवनात हिऱ्यासारखे चमकतात. कारण हे लोक जीवनातील कृतीची विभागणी सोयीस्करपणे करून त्यानुसार मार्गक्रमण करतात. योग्य गोष्ट, योग्यवेळी योग्य मार्गाने योग्य वेळेला करण्याची कसब म्हणजेच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली होय.
जीवनात यशवंत ठरण्यासाठी बारीक सारीक गोष्टीमध्ये गुंतून राहण्याची सवय मोडली पाहिजे. जीवनाच्या प्रवासात उद्‍भवणाऱ्या अडचणी या क्षणिक असल्याचे समजून त्यावर मात करण्याची कला अवगत असणे जरुरीचे आहे. ध्येयपूर्तीकडे लक्ष केंद्रित करून यश प्राप्तीचा संकल्प तडीस नेण्याची विचारधारा माणसाला जीवनात नक्कीच यशवंत होण्यासाठी मदत करेल. यात शंका नाही. फक्त कष्ट करण्याची तयारी असायला हवी.
माणसाने जीवनात यशस्वी शिखर गाठण्यासाठी प्रयत्न जरूर करावेत. उज्वल भवितव्य घडविण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार करून निर्णय घेतल्यास अडचण व जीवनाची नौका पैलतीर नेण्यास सुकर होईल असे मला वाटते. जीवनाचा रथ हालण्याकरिता पैशाची आवश्यकता असते. महिन्याच्या कमाईवर बरेच काही अवलंबून असते.
महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पगाराचे विभाजन अशा प्रकारे करायला हवे की वायफळ खर्च टाळावा. किंवा माणसाने एका पगारावर अवलंबून न राहता मासिक खर्चात थोडीशी काटकसर करू शिल्लक पैसे गुंतवणुकीत टाळावे जेणेकरून थोडे का होईना उत्पन्नाची वेगळी साधने निर्माण होईल. शिवाय आवश्यकता नसलेल्या वस्तू खरेदीवर वायफळ खर्च करण्याचे टाळावे. पैसे हातात आहेत. म्हणून अनावश्यक वस्तू खरेदी करत राहिल्यास कदाचित गरजेच्या वस्तू विकण्याची पाळी येऊ शकते.
आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती मिळणाऱ्या मिळकतीवर घरसंसार चालविण्याचा खटाटोप करतो. महागाई या भस्मासुर एवढा माजलेला
आहे की, सुखाने जीवन जगणे व्यथित होऊन बसले आहे. महागाईचा फोफावणारा अक्राळविक्राळ चेहरा सध्यातरी आळाबंद आणणे शक्य नाही. त्यासाठी महागाईच्या युगात प्रत्येकाने बचतीचा फॉर्मुला वापरण्याची गरज आहे. आवश्यक असलेली खरेदी करून पैसे शिल्लक उरल्यास बचत करण्याचा फार्मुला सोडून पगार झाल्यावर पहिल्यांदा थोडीशी बचत झाली नंतर आवश्यक खरेदी करण्यावर भर देण्याचा नवा फंडा आत्मसात केला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक युगात दोन होड्यांवर पाय ठेवून स्वतःला तपासण्याचा कधीही प्रयत्न करू नये. सक्षम विचारसरणीच्या जोरावर आपल्या विचारांवर प्रगल्भता असणे जरुरीचे आहे. नदीच्या पात्राची खोली तपासण्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे आहे तर आजच्या घडीला माणसाने दोन्ही पाय घट्ट जमिनीवर ठेवून येणाऱ्या वादळ-वाऱ्याचा सामना करण्याची गरज आहे. वादळ-वारे नेहमीच घोंघावेल. पण आपण त्याचा सामना केल्यास विजय हा शेवटी आपलाच असतो हे विसरून चालता कामा नये.
सुखी संसार घालविण्याच्या आजच्या आधुनिक युगात अनेक क्लृप्त्या आहेत. सफेद पांढऱ्या कोऱ्या कागदावर समजा शाईचा डाग पडला तर संपूर्ण कागद खराब होतो. तशा आशयाचे डाग माणसाने आपल्यावर घेऊ नये. वर्तमान काळात वावरत असताना माणसाची नजर चौफेर असायला हवी. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे सूक्ष्म स्वरूपात पाहण्याची आवश्‍यकता आहे. माणसाचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असायला हवा. भूतकाळाकडे गांभीर्याने न पाहता वर्तमान काळात जगून भविष्यकाळ सुखमय करण्याची स्वप्ने माणसाने आपल्या उराशी बाळगायला हवीत. तरच आपला भवितव्य उज्वल होण्यास मदत होईल.
आजच्या घडीला विद्यमान स्थितीचा विचार केल्यास प्रत्येक माणसाची वृत्ती ही सकारात्मक असते. विशाल दृष्टिकोन त्यांनी बाळगलेला असतो. मात्र त्यांच्या जडण घडणीत थोडासा जरी खंड पडला तर त्यांच्या प्रगल्भ विचारांना भेगा पडतात व कालांतराने त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्या रुंदावतात. अशावेळी आईवडिलांनी किंवा पालकांनी केलेली मलमपट्टी रुळावरून घसरलेली गाडी पुनश्‍च रुळावर मलमपट्टी रुळावरून घसरलेली गाडी पुनश्‍च रुळावर आणण्यास मदत होते. अन्यथा वाईट संगतीने माणूस वाईट कृत्याच्या दलदलीत फेकला जातो. ज्यामधून बाहेर पडणे खूपच कठीण होते. घरातील एखाद्याला उंच आकाशात गवसणी घालण्याची इच्छा झाल्यात त्यांना मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे. घरातील माणसांच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम पालकांनी केले पाहिजे

.संपादन हेमा फडते

 

संबंधित बातम्या