आजचा दिवस मातीचा...

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 5 डिसेंबर 2020

कृषीप्रधान म्हणवणाऱ्या आपल्या या देशासाठी, नव्हे जगासाठीच जमिनीची नैसर्गिक योग्यता टिकवून ठेवण्यासाठी जागतिक मृदा  दिवसाचे औचित्य आत्यंतिक महत्वाचे ठरते. 
 

आज 5 डिसेंबर रोजी जगभरात तसे काहीही महत्वाचे घडत नाही. परंतु केवळ ज्या मातीमुळे आपल्या दोन वेळच्या अन्नाची सोय होते. त्या मातीच्या उत्सवाचा आज दिवस असतो. जागतिक मृदा दिन.  याआधी 2017मध्ये हा दिन साजरा केला गेला होता. त्याच्याही आधी 2013 मध्य़े जागतिक मृदा दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. शेतकऱ्यांना मृदा संवर्धनाबाबत जागरूक करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. रासायनिक शेतीच्या आधुनिक या काळात किटकनाशकांमुळे कमी होणारी जमिनीची सुपीकता आणि मातीमधील नैसर्गिक घटकांचा होणारा ऱ्हास यामुळे कृषीप्रधान म्हणवणाऱ्या आपल्या या देशासाठी, नव्हे जगासाठीच जमिनीची नैसर्गिक योग्यता टिकवून ठेवण्यासाठी या दिवसाचे औचित्य आत्यंतिक महत्वाचे ठरते. 
 
काय आहे या दिवसाचा इतिहास? 

थायलंडचा राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचा जन्मदिवस जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भूमिबोल अदुल्यादेज यांनी 70 वर्ष थायलंडच्या भूमीवर राज्य केलं. आपल्या या शासनकाळात त्यांनी सर्वाधिक लक्ष शेतीकडे दिले. त्यांनी शेतीसाठी खूप प्रयत्न केले. शेतीच्या विकासासाठी ते गरीब आणि शेतकऱ्यांना स्वत: जाऊन भेटत असत. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी भूमिबोल यांच्या शासनकाळात सोडवल्याची अनेक उदाहरणे आजही आख्यायिकांसारखी प्रसिद्ध आहेत. 

का महत्वाचा आहे हा दिवस?

जगातील अनेक देशांमध्ये कृषी संस्कृती नांदते. जगभरातील ही कृषी संस्कृती लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघाने शेतकऱ्यांसाठी अनेक अभियाने राबविले. ज्यात मृदा संधारणावर अधिक भर दिला आहे.

भारतातही अगदी अतिप्राचीन काळापासून ही कृषी संस्कृती अस्तित्वात आहे. भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. मृदा संवर्धनासाठी मागच्या दोन दशकांपासून भारतात असंख्य अभियाने राबविली गेली. अनेक प्रकल्प केंद्र सरकारने सुरू केले. पंतप्रधान मोदी यांनीही 'स्वस्थ धरा हर खेत का नारा' असा संकल्प करत शेतकऱ्यांना बळ दिले. शेतकऱ्यांसाठी भारतात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. शेतकरी पीक विमा योजना यात आघाडीवर आहेत. या योजनेच्या आधारे शेतकऱ्यांना 6000 रूपयांचे वार्षिक वेतन दिले जाते. याव्यतिरिक्त 2015मध्ये पंतप्रधान मोदी यांनी मातीच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी मृदा आरोग्य कार्डाची सुरूवात केली होती. या योजनेमुळेही शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळाले आहेत. 

 

  
  

 

संबंधित बातम्या