माझ्या गोव्याच्या भूमीत चाललंय तरी काय...

What going on in my Goa land ...

Dainik Gomantak 

माझ्या गोव्याच्या भूमीत चाललंय तरी काय...

एक प्रभावी छायाचित्र म्हणून राजतिलक नाईक यांचे अभिनंदन करावे की आपल्या कायद्याची लक्तरे अशी उघड्यावर टांगलेली पाहताना हतबल व्हावे? पण हे असेच तर चालले आहे.

गोव्याचे (Goa) प्रतिभावंत छायापत्रकार राजतिलक नाईक यांनी अलीकडच्याच दिवसात घेतलेले गोव्यातील कळंगुट किनाऱ्यावरचे हे छायाचित्र. हे छायाचित्र काय सांगते?आपल्या गोव्याची जी बदनामीकारक प्रतिमा देशभर पसरून आहे त्याचीच पुष्टी तर ते करत नाही ना? कोण आहेत हे लोक जे मोकळेपणी आणि उद्दामपणाने भर समुद्राकिनाऱ्यांवर (Beach) सर्वांसमोर मदिरापान करत आहेत? काय म्हणून आंदण मिळाल्यासारखे त्यांनी गोव्याचे हे क्षेत्र आपल्या मालकीचे करून घेतले आहे आणि गोव्याचे कायदे-कानून ते असे बेपर्वा लाथाडत आहेत?

एक प्रभावी छायाचित्र म्हणून राजतिलक नाईक यांचे अभिनंदन करावे की आपल्या कायद्याची लक्तरे अशी उघड्यावर टांगलेली पाहताना हतबल व्हावे? पण हे असेच तर चालले आहे. कायदे तर पुरेसे आहेत. आपले मुख्यमंत्री तर कायद्यासमोर कुणाचीच गय होणार नाही हे तावातावाने नित्य सांगत असतात पण सभोवार पहावे तर कायद्याची ऐशीतैशी होताना सर्रासपणे दिसते आहे. पान गुटखा सर्रास सारीकडे मिळतो. तो खाऊन थुंकणारे भर रस्त्यावर थुंकत जाताना दिसतात. 100 टक्के हागणदारीमुक्त या राज्यात नदीच्या किनाऱ्याने शौचाला बसलेले लोक उघड्या डोळ्यांना दिसत राहतात. रस्त्याच्या कडेला सर्वत्र केर-कचऱ्याचे साम्राज्य तर मानवंदना दिल्यासारखे लांबलचक पसरून असते. आज रस्त्यावरचे खड्डे बुजवावेत तर रावणाच्या धडावर शीर उगवल्यासारखे ते पुन्हापुन्हा उगवतच असतात. हे सारं घडतानाही, ज्यांनी हे सारं घडू नये म्हणून दक्ष राहायचे असते ते रक्षक मात्र कायद्याचे कागदी घोडे नाचवत पोकळ इशारे देत राहतात.

<div class="paragraphs"><p>What going on in my Goa land ...</p></div>
गोव्यातील मिलिंद म्हाडगुत एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती झालेल्या या राज्यात राजतिलक यांच्या छायाचित्रांमधून दिसणारे पर्यटकांचे (Tourist) ते बिनधास्त टोळके हा एकमेव अपवाद नाही. उघड्यावर मद्यपान करणे हा गुन्हा आहे हे ठाऊक असतानादेखील, पर्यटनबहुल राज्यात ‘हे असे घडणे स्वाभाविक आहे’ अशा विचाराने डोळेझाक करणारी आपली व्यवस्थाच सभोवताली दिसणाऱ्या या ओंगळतेला कारणीभूत आहे.

काय दिसते आहे या छायाचित्रात? टोळक्यात एकटा मदमस्तपणे दारूची बाटली तोंडाला लावून लाटांमधून चालतो आहे. दुसरे जे मागे आहेत त्यांच्यापैकी एकाच्या हातातही असेच काहीसे दिसते आहे. मागची टोळी पिणाऱ्याच्या दिशेने धावून येत आहे. (आपल्या वाट्याच्या घोटासाठी तर नव्हे?). हे सारे दृश्य त्यांच्यापैकीच एकटा आपल्या मोबाईलवर (Mobile) टिपून घेतो आहे. साऱ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा बेपर्वाईचा अविर्भाव आहे. जणू याप्रकारे मौजमजा करण्यात व अशातऱ्हेचे कृत्य करण्यास या क्षेत्रात कोणाचाही मज्जाव नाही व हा एक अभिमानास्पद क्षण आहे, जो इतरांबरोबर वाटून घेण्यासाठी कॅमेऱ्यात (Camera) कैद झाला पाहिजे, -अशातऱ्हेने काहीसे या दृश्याचे वर्णन करता येईल. या साऱ्या बोलक्या दृश्याला, त्याचे व्यंगात्मक महत्त्व अचूक क्षणी जाणून घेऊन, आपल्या कॅमेऱ्यात पकडणाऱ्या राजतिलकचे अभिनंदन. द्विधा मनस्थितीत का होईना पण करायलाच हवे. हे दृश्य केवळ एका किनाऱ्यावरच्या (Beach) एका घटनेबद्दल आम्हाला सांगत नाही तर बेसावधपणे आज आपण कोठे चाललो आहोत याचेच ते निर्देशन करते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com