गोव्याच्या शिम्गोत्सवाची पर्यटक का पाहतात वाट?

गोव्याच्या शिम्गोत्सवाची पर्यटक का पाहतात वाट?
Why are tourists waiting for Goa Shimgotsava

शिम्गोत्सव भारतातील वंसत ऋुतुच्या सुरुवातीला हा उत्सव गोव्यात साजरा केला जातो. हिंदु कॅलेंडरनुसार शिम्गोत्सवाचा प्रारंभ फाल्गुन महिन्यात  होतो आणि गुढी पाडव्या ला या मोहोत्सवाची सांगता केली जाते. ज्याला हिंदू नववर्ष म्हणुन देखील जातो. चौदा दिवसाचा हा उत्सव  होळीच्या सुरुवातीला गोव्यात साजरा केला जातो. होळी हा रंगाचा सण आहे आणि हा उत्साह १५ दिवसापासून गोव्यात साजरा केला जातो. होळी हा रंगाचा सण गोव्याचे लोकं जल्लोषात साजरा करतात.

गोवा कोकण संस्कृतीचा समृध्द वारसा आहे. गोव्यात  शिम्गोत्सवाचे खूप महत्व आहे हा सण गोव्यात मुख्य सणांपैकी एक मानला जातो. शिम्गोत्सवासारख्या महोत्सवाचा साक्षी होणे प्रत्येकाला आवडतं म्हणूनच या दिवसांत गोव्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. 

या उत्सवात  नाटक, लोकनृत्य आणि अशा बऱ्याच लोकसंगीताची, नृत्याची झलक बघायला मिळते. मनोरंजक कार्यक्रमामध्ये तळगडी,हनपेट,फुगाडी,गोपा आणि दिवा नृत्य या सारख्या लोकनृत्याचा समावेश असतो.

नमन आणि जोत हे लोक गाण्याचे प्रकार आहेत जे पुरुष मंडळी सामुहिक पद्धतीने गातात. या उत्सावाची सुरुवात वेगवेगळ्या मंदिरातील देवतांची प्रार्थना करून केली जाते. पहिल्या दिवसाला धूलिवंदन आणि दुसऱ्या दिवसाला रंगपंचमी चा आनंद घेतला जातो. 

येणाऱ्या दिवसात असा असणार क्रम

  • 16 मार्च -म्हापसा
  • 17 मार्च - कुंकळ्ळी
  • 18 मार्च - वास्को
  • 19 मार्च - पेडणे
  • 24 मार्च - धारबांदोडा
  •  
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com