‘वर्ल्ड विंड डे’ का साजरा करतात ? जाणून घ्या याचे महत्त्व 

‘वर्ल्ड विंड डे’ का साजरा करतात ? जाणून घ्या याचे महत्त्व 
wind energy.jpg

लोकांमध्ये पवन उर्जेचा (Wind Energy) उपयोग आणि त्याच्या शक्तीबाबतची जागृती (Awareness) निर्माण करण्याकरीता दरवर्षी 15 जूनला ‘वर्ल्ड विंड डे’ हा दिवस साजरा करण्यात येतो. ‘वर्ल्ड विंड डे’ ला पवन उर्जा असेही म्हणले जाते. पवन उर्जा हा उर्जेचा एक नैसर्गिक प्रकार असून, तो उर्जा प्रणालींना आकार देण्यास मदत करतो. ही उर्जा आर्थिक आणि इतर अनेक माध्यमातून आपल्याला फायदेशीर आहे. (Why celebrate World Wind Day?)

2007 साली युरोपात या दिवसाची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी EWEA (यूरोपियन विंड एनर्जी एसोसिएशन) ने  हा ‘पवन दिन’ म्हणून साजरा केला. परंतु या दिवसाचे महत्त्व सर्व जगाला लक्षात आल्यावर 2009 साली GWEC (ग्लोबल विंड एनर्जी काउंसिल) ने ‘ग्लोबल विंड डे’ (जागतिक पवन दिवस) म्हणून प्रसिध्द केला. म्हणून याला दिवसाला ‘ग्लोबल विंड डे’ असेही संबोधले जाते.

रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास मदत                                                               उर्जा विभागामध्ये पवन ऊर्जा देशाच्या आर्थिक वाढीसोबातच रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास देखील मदत करु शकते. त्यामुळे दरवर्षी युरोपियन पवन उर्जा संघटना आणि ग्लोबल विंड डे यांच्या वतीने या दिवसाचे औचित्यसाधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या निमित्त विविध स्पर्धा देखील घेण्यात येतात. 

वातावरणातील हानिकारक उत्सर्जन करते कमी
युरोपियन विंड डे (EWEA) आणि जीडब्ल्यूईसी (GWEC) यांनी 2019 मध्ये फ्यूचर विंड नावाची आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. ज्यामध्ये 50 देश सहभागी झाले होते. यामधून तब्बल 600 छायाचित्रे मिळाली होती. पवन उर्जा वातावरणातील हानिकारक उत्सर्जन कमी करु शकते यावर प्रकाश टाकणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. 

जागतिक राष्ट्रम्हणून एकत्रित काम करण्यासाठी आणि उर्जेच्या नैसर्गिक स्त्रोताविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अनेक देश या स्पर्धांमध्ये भाग घेतात. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर संस्था या पवन उर्जेचे महत्त्व मुलांना समजून सांगण्यास मदत करतात. तर अनेक जण वर्ल्ड विंड डे चे फोटो एकमेकांना पाठवून या दिवसाचे महत्त्व सांगत साजरा करतात.

नवीन उर्जा स्त्रोतांत भारताची क्रांती 
भारत नवीन उर्जा स्त्रोतांमध्ये क्रांती करत आहे. यासाठी सरकारने 2022 पर्यंत 175 गीगावॅटचे ध्येय ठेवले आहे. राज्यांनी हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन यावर काम करणे सुरु केले आहे. यासाठी अनेक राज्यांनी सोलर आणि पवन उर्जेत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. 

या 9  राज्यांनी पवन उर्जेला केले कार्यान्वीत  
1)    तामिळनाडू – देशात सर्वात जास्त पवन उर्जा क्षमता असलेल्या राज्यांच्या यादीत तामिळनाडू प्रथम आहे. 2018 पर्यंत या राज्यात एकूण पवन क्षमता 8,631 मेगावॉट इतकी होती. तर यातून 30, 447 मेगावॉट इतकी पवन उर्जा निर्माण झाली आहे.  
2)    गुजरात – पवन उर्जा क्षमतेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या यादीत देशात गुजरातचा नंबर लागतो. या राज्याची एकूण पवन क्षमता 2018 पर्यंत 6044  मेगावॉट इतकी होती. तर यातून 31,382 मेगावॉट  इतक्या उर्जेचा स्त्रोत निर्माण झाला आहे. यात वाऱ्याचा वाटा 19.25 टक्के होता.  
3)    महाराष्ट्र – पवन उर्जा निर्मिती क्षमतेत महाराष्ट्राचा तिसरा नंबर लागतो. 2018 पर्यंत राज्यात पवन क्षमता 4789 मेगावॉट इतकी होती. त्यातून 43,779 मेगावॉट इतकी उर्जा निर्माण केली आहे. या मध्ये वाऱ्याचा वाटा 11 टक्के इतका होता. 
4)    कर्नाटक – या राज्याचा पवन उर्जा निर्मितीमध्ये देशात चौथा क्रमांक आहे. कर्नाटक राज्याने 2018 पर्यंत 4584 मेगावॉट इतकी पवन क्षमता निर्माण केली आणि त्याव्दारे 27199 मेगावॉट ऐवढी उर्जा निर्माण झाली. 
5)    राजस्थान – देशात पवन उर्जेच्या क्षमतेत राजस्थान पाचव्या क्रमांकावर आहे. 2018 पर्यंत या राज्यात पवन क्षमता 4,300 मेगावॉट इतकी होती. त्यातून 21,833 मेगावॉट इतकी विजनिर्मिती झाली आहे. 
6)   आंध्र प्रदेश – देशातील पवन उर्जा निर्मिती क्षमतेमध्ये या राज्याचा सहावा क्रमांक लागतो. या राज्याने 2018 पर्यंत 4007 मेगावॉट पवन क्षमता निर्माण केली असून, त्यातून 2018 च्या शेवटापर्यंत 23,726 मेगावॉट इतकी उर्जा निर्माण झाली आहे. यात वाऱ्याचा वाटा 17 टक्के इतका होता. 
7)    मध्य प्रदेश – मध्यप्रदेश देशातील सातव्या क्रमांकाचे राज्य असून 2018 पर्यंत 2520 मेगावॉट पवन क्षमता निर्माण केली असून, त्यातून 21,873 मेगावॉट इतकी उर्जेची क्षमता निर्माण झाली आहे. यात वाऱ्याचा वाटा 11.52 टक्के इतका होता. 
8)     तेलंगणा – तेलंगणाने 2018 पर्यंत 128  मेगावॉट पवन क्षमता निर्माण केली आहे. तर 15,944 उर्जा निर्माण केली आहे. यात वाऱ्याचा वाटा 0.80  टक्के होता. 
9)    केरळ – केरळची 2018 पर्यंत पवन क्षमता 53 मेगावॉट इतकी आहे. या राज्याने 5083 मेगावॉट विजनिर्माण केली आहे. यात वाऱ्याचा वाटा 1.04 टक्के होता.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com