न्याहाळत उभे राहावे अश्या आहेत गोव्याच्या खिडक्या...

खिडक्यांचे इंडो-पोर्तुगीज स्थापत्य त्यांना वेगळेपणा प्रदान करते.
न्याहाळत उभे राहावे अश्या आहेत गोव्याच्या खिडक्या...
Windows Of Goa Dainik Gomantak

गोवा: घराच्या खिडक्या हे घराचे डोळेच असतात. एखाद्या माणसाचे भाव जसे डोळ्यांमधून वाचता येतात तसेच घरांच्या खिडक्यांमधून घराबद्दल जाणता येते. गोव्यातील परंपरागत घरांच्या खिडक्या तर घराचे कुळच कथन करतात. गोव्यातील अनेक जुन्या घरांच्या खिडक्या, अजूनही मान मागे वळवून पाहायला लावतात. अर्थात, खिडक्यांचे सौंदर्य नीट न्याहाळण्यासाठी पायी चालण्याची तयारी मात्र हवी. पणजीच्या जुन्या गल्ल्यांमधून पायी फेरफटका मारत जाणारे पर्यटक अशा खिडक्यांना न्याहाळत उभे असल्याचे चित्र हमखास दिसते. या खिडक्यांचे इंडो-पोर्तुगीज स्थापत्य त्यांना वेगळेपणा प्रदान करते.

गोव्याच्या वारसा वास्तूबद्दल लिहिताना हेता पंडित लिहितात, ‘रस्त्याला तोंड करून असणाऱ्या खिडक्या या ठाम विधान करत असतात. त्या घराच्या रचनांना एक व्यक्तिमत्व प्रदान करतात. त्या आपल्या घरमालकाच्या गावातल्या आणि समाजातल्या स्थानाबद्दल सांगतात आणि घरमालकाच्या उंचावत जाणाऱ्या स्थानासरशी त्या अधिक सुशोभित आणि अर्थपूर्ण बनत जातात.’

Windows Of Goa
स्वातंत्र्यलढा मोडण्यासाठी बनवलेला देशद्रोहाचा कायदा आज किती उपयोगी ?

या खिडक्यांना वळणदार आणि विस्तृत कडा असायच्या आणि त्यांची तावदाने शिंपल्यानी सजलेली असायची. गोव्यात काच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आली पण त्या अगोदर या शिंपल्यानी घराच्या अंतर्भागाला बाहेरच्या नजरांपासून संरक्षण देऊन खाजगीपणा पुरवला आणि फिल्टर करून शुभ्र प्रकाशही दिला. ही शिंपल्यांची कवचे खारफुटीच्या उथळ भागातून मिळवली जात असत आणि नंतर त्यांचे साधारण 2 X 2 इंचाचे तुकडे करून ती खिडकीच्या तावदानच्या खाचेत बसवली जात. या शिंपल्यांचा तावदानात बसवण्याची मूळ कल्पना पोर्तुगालवरूनच गोव्याला आली. जेव्हा धर्मांतरे घडली तेव्हा घरांची रचनाही बदलली. खिडक्या रूंद झाल्या. रस्त्याला दिशा करून असणाऱ्या खिडक्या झाकण्यासाठी काहीतरी हवे होते. काच अर्थात दुर्मिळ आणि महाग होती. शिंपल्याच्या तुकड्यांनी छान पर्याय दिला आणि तो बहुतेक घरांनी स्वीकारला. सजावटीची एक नवीन पद्धत रूढ झाली.

Windows Of Goa
आंब्याच्या फेस्तात महिलांनी सादर केले 'घुमटांचे वादन'

मुरगाव तालुक्यातील, चिखली भागातल्या खाडीत या शिंपल्या बहुतेक मिळायच्या. या शिंपल्यांपासून नंतर हस्तकलाकृतीही निर्माण व्हायला लागल्या आणि मग त्यांना व्यापारी मूल्य आले. अलीकडच्या काळात ही जाणीव झाली की या शिंपल्यांच्या व्यापारी मूल्यांमुळे या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हे शिंपले गोळा करणे किंवा त्याची विक्री करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

गोव्यात अनेक घरांच्या खिडक्यांना अजूनही शिंपल्यांनी सजलेली तावदाने आहेत. बाहेरून त्यांचे सौंदर्य न्याहाळाच पण शक्य असल्यास, त्यातून आरपार येणाऱ्या प्रकाशाला सौम्य बनवून घराच्या अंतर्भागाला त्या कसे मोहक रूप देतात हे देखील पहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.