स्त्रीचं जग विस्तारतंय

ज्योती कुंकळकर
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

आजच्या स्त्रीला आत्मभान आहे. तिला प्रश्‍न पडतात. त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यात तिला खूप रस आहे. स्वतःचं आयुष्‍य आणि कुटुंब अधिकाधिक समृद्ध आणि सुंदर करण्याची इच्छा बाळगते. मात्र, एक खर आजच्या कुटुंबातला तरुण पुरुष बदलतो आहे. याचं कारण शिक्षण- नोकरी निमित्त तो इतर राज्यांत परदेशात जातो.

ज्योती कुंकळकर

स्त्री बदलते आहे, म्हणजे नेमके काय? ग्लोबलायझेशनचा तिच्यावर, तिच्या कुटुंबावर परिणाम झाला की नाही? नक्‍कीच झाला, माझी एक संचालक मैत्रीण आहे. १०-१५ वर्षांपूर्वी आपले सेविंग फक्त सोनं घेण्यात वा एखादा प्लॅट घेण्यात पटाईत होती, पण गेल्या आठ वर्षात तीन अख्ख जग बघितलं. पहिलं १८-२० देश पाहिले, हा बदल माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे.
आजच्या स्त्रीनं खूप प्रगती केली आहे. तिच्या जगण्याला दिशा मिळाली आहे. स्वतःचा विचार आहे. तिच्यापुढे काही समस्याच नाहीत असं नाही, पण आजची स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. त्याचा फायदा मुलांना चांगलं उच्च शिक्षण मिळतं. घरं-दारं घेतली जातात. घरात सुख सोयीच्या चार वस्तू येतात. त्यांचा कुटुंबावर चांगला परिणाम होतो.
सबलीकरण, सशक्तीकरण, स्वयंसाहाय्यात हे सध्या परवलीचे शब्द झाले आहेत. सामाजिक, संस्थांच्या संस्कृतीतून निर्माण झालेल्या या संज्ञा वापरून गुळगुळीत झाल्या असल्या तरी, त्या तकलादू नाहीत. गावागावांतून, वाड्यावाड्यांवर त्याची बीजं रोवली गेली आहेत. या महिलांची कामगिरी किंवा त्यांना मिळवलेली पदं फार मोठी नसतील, मात्र त्यासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्यात गाठलेला पल्ला लक्षणीय वाटला. माझ्या घरात काम करणाऱ्या आश्‍विनी आणि शोभा दोघीनांही व्यवहारज्ञान इतकं चांगलं आहे, की त्यांच्याकडून खूप काही कळतं. बचत कशी करायची, कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि हे सगळं करताना स्वतःसाठी थोडी हौस-मौज सुध्दा करायला पाहिजे, हे ही त्यांना माहीत आहे.
एक काळ असा होता, कारल्याची वेल लावली हो सासुबाई, आता तरी जाऊ का माहेरी? माहेरी? हे भोंडल्याचे गाणं सगळ्यांना आठवणार, माहेरी जाणं सोडा, पण आपल्याला कारल्याची वेल लावून त्याला पाणी घालून, कारली येऊन, त्यांची भाजी करून, घरादाराला खाऊ घालून स्वतःला हवं ते करायची संधी आज मिळते.
गेल्या ५०-६० वर्षात आम्ही खूप स्त्रिया पाहिल्या, प्रत्येकीचं अंगण वेगळं, आकाश-क्षितिज वेगळं, भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, कारण ज्यावेळी आपण एखादी आसामी, हिंदी, बंगाली, उडिया, पंजाबी, उर्दू या भाषेतील ज्ञानपिठकार लेखिकांच्या कथा वाचतो, तेव्हा प्रत्येक राज्यातील स्त्री वेगळी असली तरी भाषा, अन्नसंस्कृती- वेश जरी वेगळा असला तरी सगळ्या स्त्रींची दुःख मात्र एकच, पण ती बदलत गेली आहे. या ५० वर्षात बदलली ती स्त्री पुरुष मात्र आहे तसाच आहे. अनेक स्त्रिया आमचा आदर्श ठरल्या. काल-परवा पर्यंत माजघरात गुरफटणारी स्त्री आज आकाशात तरगंते हाच आज मोठा बदल २१ व्या शतकात होत आहे.
पण मनाला एक खंत एक लेखिका आणि चित्रपटनिर्माती म्हणून होते. ती म्हणजे समाजातली स्त्री ज्या गतीने बदलली त्या गतीनं रुपेरी पडद्यावरील तिची प्रतिमा बदलेली दाखवत नाही. नवरा शेतावर राबतो आणि बायको दुपारच्या वेळी त्याला भाकरी-भाजी घेऊन येते, असं शेतकऱ्यांचे चित्रपटातून दिसणार चित्र. काही महिन्यापूर्वी मी निपाणीला गेले होते तर बहुतेक विदर्भात बाई शेती करते. घरचं सगळं उरकूनच आलेली असते. शेतकरी हा शब्द पुरुष असला तरी तो आता स्त्रियांच्या बाबतीत लागू होत आहे. आजचा बदल मला फार मोठा वाटतो. बचत गटाच्या चळवळीने महिलांना आत्मविश्‍वास दिला. उंबऱ्या पलीकडचं क्षितिज दाखवलं अजूनही योग्य दिशा मिळाली तर भविष्य निश्‍चितच वेगळं असू शकतं.
आजच्या स्त्रीला आत्मभान आहे. तिला प्रश्‍न पडतात. त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यात तिला खूप रस आहे. स्वतःचं आयुष्‍य आणि कुटुंब अधिकाधिक समृद्ध आणि सुंदर करण्याची इच्छा बाळगते. मात्र, एक खर आजच्या कुटुंबातला तरुण पुरुष बदलतो आहे. याचं कारण शिक्षण- नोकरी निमित्त तो इतर राज्यांत परदेशात जातो. स्वतः सगळी कामं करतो. भरपूर अनुभव त्यांच्या गाठीशी जमा होतो. आजच्या स्त्रीने जे काही मिळवलंय त्याचा आदर करायला तो शिकला आहे.
तिच्या मॅल्टिटास्किंग प्रतिभेचं कौतुक तो करतो. आपलं नाव न लावता बायको माहेरचं नाव लावते, याचा आज तो बाऊ करत नाही. उलट नोकरी- करिअर करून आलेल्या बायकोला किचनमध्ये मदत करतो. कॉफी करून देतो. मुलांची टिफिन ही भरतो. आज त्याला आपली बायको सहचरी- मैत्रीण वाटते आणि काही महत्त्वाच्या निर्णयात तिचं मत त्याला महत्त्वाचं वाटतं.
आज पिढ्यांमधली जवळीकही खूप सुंदर झाली आहे. वडील- आजोबा वा सासू -सासरे प्रत्येक नातं ठरावीक अंतरावर असायचं. पण आज पिढी बदलली. मुलगी आणि आई मैत्रिणी झाल्या. मुलगा
आणि वडील दोघं बरोबर सिनेमा- मॅच बघायला जातात. घरात सून
आली मम्मी- पप्पा म्हणून मुलीचं प्रेम द्यायला लागली.
कालची पिढी, आजची आणि उद्याची पिढी असे स्थूल मानाने तीन भाग करायचे झाले तर नात्यात प्रचंड वेगाने बदल झालेले जाणवतात. महत्‍त्वाचं म्हणजे आजची स्त्री आणि तंत्रज्ञान यांच आज एक वेगळ नातं झाले. हळूहळू विकसित झालेल्या तंत्रज्ञानाने सतत कामात बांधलेल्या तिच्या हातांना मोकळं केलं विकासाच्या टप्प्यावर तिचा वेळ वाचवला. साठ-सत्तर वर्षाची आजी आज कॉम्‍प्युटर, इंटरनेट या गोष्टी शिकून परदेशात असणाऱ्या आपल्या नातवांशी ‘स्कायप़’ वर बोलतात. व्हिडिओकॉलिंग करतात वॉटस् अप वाचतात हा कुटुंबातला बदल खूप महत्त्वाचा आहे. पण स्त्री ही कुटुंब व्यवस्थेची समाजाची आधार आह

संबंधित बातम्या