World Bicycle Day: सायकल प्रेमाची साइकोलॉजी!

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 जून 2021

आज जागतिक सायकलदिन साजरा केला जात असून त्यानिमित्ताने सायकलचे महत्त्व पुन्हा प्रकाशात आले आहे.

पणजी: एकेकाळी सायकलचा (Bicycle) सर्वसामान्य लोकांकडून आणि इतर वर्गांकडूनही मोठ्या प्रमाणात वापर होत होता. मात्र त्यानंतर दुचाक्या आणि खास करून गीअरलेस स्कूटर्स तसेच मोटरगाड्या यांचा सुळसुळाट झाल्याने सायकलचा वापर कमी होत गेला. परंतु पुन्हा एकदा आता सायकलकडे लोक वळताना दिसून येत असून यामागे प्रवासाचे सहज-सोपे माध्यम हे नव्हे, तर व्यायामाचे कारण लपलेले आहे. तंदुरुस्ती राखण्याच्या दृष्टीने सायकल चालविण्याला असलेले महत्त्व लोकांना आता पटलेले आहे.

आज जागतिक सायकलदिन साजरा ( World Cycling Day) केला जात असून त्यानिमित्ताने सायकलचे महत्त्व पुन्हा प्रकाशात आले आहे. ३ जून, २०१८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) आमसभेने न्यूयॉर्कमध्ये (New York) पहिला जागतिक सायकलदिन साजरा केला. सदर दिन जगभरात साजरा केला जातो आणि त्यानिमित्त विविध कार्यक्रम केले जातात. सध्या कोरोना महामारी (Corona) चालत असल्यामुळे या कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. जगात जे विविध सायकलपटू आहेत त्यांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने या दिनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. यंदा चौथा जागतिक सायकलदिन साजरा केला जाणार असून त्याची संकल्पना ''वाहतुकीचे साधे, टिकावू, वाजवी आणि विश्वासार्ह माध्यम या नात्याने सायकलचे वेगळेपण, अष्टपैलूत्व आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता'' अशी आहे.(World Bicycle Day Psychology of bicycle love)

World No Tobacco Day 2021: तंबाखू, बिडी, सिगार 'प्लिज छोड दो मेरे यार'

गोव्यातही (Goa) सायकल चालविण्याकडे कल वाढत असलेला दिसत असून मडगाव, पणजीसह विविध ठिकाणी सायकल चालविणाऱ्यांचे क्लब तयार झालेले आहेत. कोरोना महामारी येण्यापूर्वी त्यांच्याकडून निमित सुट्टीच्या दिवशी सायकल सफरी आयोजित केल्या जायच्या. सध्या महामारीमुळे विविध निर्बंध घालण्यात आल्याने त्यांच्या आवडीवर खूप मर्यादा आलेल्या आहेत. मडगावातील (Madgaon) फ्रँकी कार्वाल्हो (Frankie Carvalho) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडे जरी कार व बुलेट असली, तरी दिवसातून रोज वेळ काढून आपण सायकल चालवण्यास मागील दोन-तीन वर्षांत सुरुवात केली होती, असे सांगितले. आपले वाढलेले वजन कमी होण्यास यामुळे मदत झाली. आपण महामारी येण्याच्या अगोदर आणि मध्यंतरी निर्बंध शिथील झालेले असता सायंकाळी किमान एक तास तरी सायकल चालवत होतो, अशी माहिती त्यांनी दिली.

World Biological Diversity Day 2021:इवल्याशा गोव्याला लाभली समृद्ध अशी...

फातोर्डा येथील नीलेश नाईक(Nilesh Naik) यांनीही सायकल चालविताना आपल्याला फार आनंद होतो आणि त्यामुळे आपल्याला तंदुरुस्त राहण्यास मदत झाली आहे, असे मत व्यक्त केले. सायकल चालविण्यास आणखी प्रोत्साहन मिळाले पाहिजे आणि त्याकरिता सवलतीच्या दरात सायकल उपलब्ध झाली पाहिजे. तसेच सायकलिंगसाठी वॉकिंग ट्रॅकच्या धर्तीवर वेगळे ट्रॅक तयार केले पाहिजेत, अशा त्यांनी सूचना केल्या. आता खूप शैलीदार तसेच महागड्या सायकली बाजारात आलेल्या आहेत. त्यामुळे सायकल चालविणे हे साधेपणाचे लक्षण राहिलेले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

संबंधित बातम्या