World Biological Diversity Day 2021:इवल्याशा गोव्याला लाभली समृद्ध अशी जैवविविधता

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 मे 2021

गोव्यातील जैववैविधता समृद्ध असली,(Goa has a rich biodiversity) तरी आगामी काळात येऊ घातलेल्या कार्पोरेट व्यवसायांच्या कचाट्यातून ही समृद्धी वाचविण्याचे आव्हान उभे ठाकल्याचे मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत.

तापमान वाढीमुळे समुद्रात वादळांची संख्या वाढत असल्याचा निर्वाळा हवामानावर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ देत आहेत. जंगले वाचली पाहिजे, यासाठी गोव्यातही(Goa) आंदोलने उभे राहत आहेत. गोव्यातील जैववैविधता(Diversity) समृद्ध असली, तरी आगामी काळात येऊ घातलेल्या कार्पोरेट व्यवसायांच्या(Business) कचाट्यातून ही समृद्धी वाचविण्याचे आव्हान उभे ठाकल्याचे मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत.(World Biological Diversity Day 2021 Goa has a rich biodiversity)

इवल्याशा गोवा राज्याला समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे. क्षेत्रफळाच्या अगदी अर्ध्याहून अधिक म्हणजे 59.94 टक्के जंगल संपत्ती आहे. त्यात अनेक प्रकारचे पशू-पक्षी आहेत. त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी सात अभयारण्येही आहेत. तरीही वन्य जीव अभ्यासकांना जैवविविधता संरक्षणासाठी कार्यरत राहावे लागणे, ही शोकांतिकाच नाही का? असा प्रश्न पर्यावरणवादी राजेंद्र केरकर उपस्थित करतात. त्याच तडफेने सुक्ष्मजीव तज्‍ज्ञ नंदकुमार कामत म्हणतात, गोव्यातील जैवविविधता समृद्ध आहे, त्याबाबत केवळ जागृतीची गरज आहे. 

Sunderlal Bahuguna: मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा, तो दवा-दारूतून मिळणार नाही’ 

राज्यात सध्या केवळ पाच वाघ असल्याची माहिती अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक संतोषकुमार देतात. पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यानुसार ही संख्या वाढायला हवी. शेजारच्या राज्यात वाघांची संख्या वाढत असताना गोव्यात का वाढत नाही, हा प्रश्नच आहे. त्यावर पर्यावणवादी रमेश गावस  म्‍हणतात, खाणी सुरू झाल्या आणि अनेक प्राणी राज्यातून परागंदा झाले. त्यांचे म्हणणे खरेच आहे. खाणींचा परिणाम वन्य प्राण्यांच्या अधिवासावर होत आहे. खाणींच्या स्फोटामुळे प्राणी परिसरातील जंगलातून पळाले आहेत. 

आधुनिकीरणाचा परिणाम सुक्ष्मजीवांवर होत असल्याचे मत नंदकुमार कामत व्यक्त करतात. शेतीतीत आधुनिकीकरण आले, त्यामुळे शेतीला उपयुक्त सूक्ष्म जीव नष्ट होत आहेत. त्यांना वाचवायला हवे. दुसरीकडे साप-पक्षी यांचीही स्थितीही वाईट आहे. 

राजीव गांधींनी घटकराज्याचा दर्जा दिलेल्या गोव्याला भाजपने केंद्रशासित केलं 

आवश्यकता सर्पोद्यानाची
महाराष्ट्रातील सर्पतज्‍ज्ञांनी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या हद्दीवर सर्पोद्यान उभारण्याचा प्रयत्न चालविला आहे, तो स्त्युत्य आहे, असे तरूण सर्पमित्र विठ्ठल शेळके सांगतात. राज्यात 30 हून अधिक सर्पांच्या प्रजाती आहेत. त्यांना वाचविण्यासाठी सर्पोद्यानाची गरज असल्याचे मत सर्पमित्र असीफ खानही व्यक्त करतो. विठ्ठल शेळके म्हणतात, फुरसे आणि घोणस यांच्या विषांमध्ये प्रत्येक राज्यांत फरक आहे. त्यामुळे त्यावर सांयुक्तिक संशोधन महत्त्‍वाचे आहे. सर्पोद्यानामुळे जनतेतील गैरसमज दूर होण्यास मदत होईलच, शिवाय संशोधनातून सर्पदंशामुळे होणारे मृत्यू घटतील. 
 

संबंधित बातम्या