जागतिक वसुंधरा दिवस : आताच सावध व्हा; नाहीतर खूप उशीर होईल

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

पर्यावरण संरक्षणाबाबत जगजागृती करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदाच जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला.

पर्यावरण संरक्षणाबाबत जगजागृती करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदाच जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. जगातील 193 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जाते. अमेरिकन सिनेटचा सदस्य जेराल्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये या दिवसाची सुरवात केली. हॉलिवूड अभिनेता एडी अल्बर्टनेदेखील जागतिक वसुंधरा दिवस सुरू करण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि 22 एप्रिल रोजी एडी अल्बर्टच्या वाढदिवशी हा दिवस साजरा करण्यास सुरवात झाली. यावर्षी म्हणजे 2021मध्ये  जागतिक वसुंधरा दिवसाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. (World Earth Day: Beware now; Otherwise it will be too late) 

World Health Day Special : निरोगी आयुष्य म्हणजे सुखी जिवन

वसुंधरा दिवस साजरा करण्याचे कारण काय?
पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनात पर्यावरण म्हणजे वसुंधरेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या पृथ्वीवरील पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्याबाबत जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या पृथ्वीवर उपस्थित सर्व सजीव प्राणी, वनस्पती यांच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो, हे देखील त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. मानवांसह जगातील सर्व प्राण्यांना चांगल्या वातावरणाची आवश्यकता असते. ज्यासाठी नेहमी प्रयत्न केले पाहिजेत.

जगासमोर ग्लोबल वार्मिंग, पर्यावरण प्रदूषण, याशिवाय पर्यावरणासंबंधी अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर हिमनग ज्या प्रकारे वितळत असल्याच्या अनेक बातम्या आपण पाहत असतो, हे हिमनग वितळण्यामागे ग्लोबल वार्मिंग हे एक कारण आहे. इतकेच नव्हे तर, जगात प्रदूषणाची पातळी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीच्या हवामान प्रणालीवरही होत आहे. जगाने याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास भविष्यात त्याचे भयावह परिणाम पाहायला मिळतील, अशी शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. 

सागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...

 जागतिक वसुंधरा दिवसाची 2021ची संकल्पना (थीम) 
सन 2021 मध्ये जागतिक वसुंधरा दिवसाची थीम 'हवामान बदल' अशी आहे. जगभरातील हवामानात होणाऱ्या बदलांमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. हवामान बदलामुळे जीवन परिवर्तन व्यवस्था धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाने एकत्र येऊन हवामान बदलासाठी काम करण्याची गरज आहे. जगातील हवामान संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे जागतिक वसुंधरा दिवस संघटनेने म्हटले आहे. 

तसेच, भोपाळ येथील ग्लोबल अर्थ सोसायटी फॉर एनवायरनमेंट एनर्जी अँड डेव्हलपमेंट या सार्वजनिक प्रयोगशाळेने गोळा केलेली माहिती अधिक धक्कादायक आहे. मॅटर, अस्थिर सेंद्रिय संयुगे, नॉक्स, सॉक्स, कार्बनॅमोनॉक्साइड आणि इतर ग्रीनहाऊस वायूंचे प्रमाण वाढत आहे. जर जग याबाबत लवकरार लवकर जागरूक झाले नाही तर  खूप उशीर होईल, असा धोका जीसीड'ने वर्तवला आहे. 

संबंधित बातम्या