जागतिक कुटुंब दिन

दैनिक गोमंतक
शनिवार, 15 मे 2021

यावर्षीचा जागतिक कुटुंब दिवस मात्र खूप वेगळा आहे.

कुटुंब (family) माणसाला उमगलेली एक उत्तम सामाजिक रचना आहे. अगदी उत्क्रांतीच्या काळापासून माणसाला कुटुंबाचे महत्त्व (family importance) माहिती होते. जगामध्ये बहुतांश ठिकाणी अजूनही एकत्र कुटुंब पाहायला मिळतात. आजी, आजोबा, आईं, वडील, भाऊ, बहीण अशी कुटुंब सध्या पाहायला मिळतात. दरवर्षी 15 मे हा जागतिक कुटुंब दिवस म्हणून ओळखला जातो. मोठे कुटुंब सुध्दा आहेत पण बदलत्या काळानुसार त्यांचं प्रमाण दुर्मिळ होत चाललंय. स्पर्धात्मक लाईफस्टाईलमुळे (lifestyle) तर आता आई, वडील आणि एक मुल हाच प्रकार मुळ धरू लागला आहे. आयुष्याच्या कुठल्याही चढ-उतार वळणावर कुटुंब खूप महत्वाची असत. सोबत सण साजरी करणे असो, कुठे फिरायला बाहेर जाणे असो कुटुंबासोबतची ती मजाच वेगळी असते. एखाद्या दुःखातुन सावरण्यासाठी किंवा वाईट परिस्थितीशी लढण्यासाठीच बळ हे कुटुंबामधून येत. एकंदरीत काय तर आयुष्यात प्रगती करण्यासाठी आणि ते सुखमय बनवण्यासाठी कुटुंबाच योगदान खूप महत्वाच असत. आपल्या आजूबाजूला निरखून पाहाल तर पशू पक्षांमध्ये पण कुटुंबाचे महत्त्व तुम्हाला जाणून येईल.

माधूरीला सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्षांनी तब्बल 120 वेळा घ्यायाला...

यावर्षीचा जागतिक कुटुंब दिवस मात्र खूप वेगळा आहे.  ज्या प्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक घटनेला सुखाची आणि दुखची बाजू असतेच. अगदी त्याचप्रमाणे आज परिस्थिति निर्माण झाली आहे. अनेकजण आपल्या कुटुंबा सोबत एकत्र राहत आहेत तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहे. घराची ओढ हि प्रत्येकाला असतेच. अनेक जण आपल्या बायको, मुल, आणि वृद्ध आई- वडिलांना भेटण्यासाठी आतुर झाले आहेत . जे लोक आपल्या कुटुंबापासून दूर आहेत त्यांना हा दिवस साजर करता येणार नाही. या लोकांपैकी अनेकजण असे असतील की त्यांना आज जगतिक कुटुंब दिन आहे हे माहिती नसेल. परंतु त्यांना देखील आपल्या कुटुंबातील सदस्याना भेटण्याची ओढ हि लागली असते.  

अनेक वर्षानंतर कुटुंबातील सर्वजण सोबत आहे. असे कुटुंब दिनाचे विशेष आहे.  कारण जगात सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावकरण्यासाठी सर्वाना घरात राहणे बंधनकारक आहे. अनेक कुटुंब आज पाहिल्यादाच  एकत्र येऊन हा दिवस साजरा करत असेल. आज सर्वजण घरी एकत्र असल्यामुळे सर्वांशी बोलणे , हसणे खेळणे होत असल्यामुळे कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. कोरोनासारखी महामारी डोक्यावर घिरट्या घालत आहे तरी सुद्धा कुटुंबातील सदस्य सोबत असल्यामुळे या महामारीचा सामना करू शकत आहे. 

सरकार बरेच काही करू शकते... पण

कुटुंबाची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणे महत्वाचे आहे. वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे पूर्ण कुटुंबाच्या आहारात योग्य बदल करणे गरजेचे आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये योग्य तो आहार घ्यायला हवा. घरातील सदस्य हे जसे कुटुंबातील असतात त्याचप्रमाणे आपल्या कॉलॉनी आणि इमारतीतील लोक मिळून देखील एक कुटुंबच तयार होते. आपल्या घरात काही शुभ कार्य असेल तर 
इतराना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. कुटुंबातील सदस्याची ज्याप्रमाणे काळजी करतो त्याच प्रमाणे आपल्या शेजारच्या लोकांची देखील काळजी घ्यायला पाहिजे. अडचणीच्यावेळी किंवा आजारपणात एकमेकाना मानसिक आधार देऊ शकतो. 

 

 

संबंधित बातम्या