World Food Safety Day: 'सुरक्षित जेवण निरोगी जीवन' 

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 जून 2021

मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या  मूलभूत गरजा आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) (WHO) नुसार दरवर्षी 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन(World Food Day) म्हणून साजरा केला जातो. अन्नधान्य जोखीमांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि खराब अन्नापासून होणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी, तसेच व्यवस्थापनास मदत करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या  मूलभूत गरजा आहेत. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर अन्न  मिळाले नाही तर व्यक्तीचा अकाली मृत्यू सुद्धा होतो. अनेकांचा भुकेने तर बऱ्याच जणांचा दूषित अन्न खल्ल्यामुळे मृत्यूला (Death) सामोरे जावे लागत आहे. लोकांना याची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. याची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली. यासाठी प्रत्येक वर्षी एक थीम देखील तयार केली जाते. (World Food Safety Day Safe Meals Healthy Living)

काय आहे या दिवसाचा इतिहास 
जागतिक आरोग्य संघटनेने अन्न-जनित रोगांचा परिणाम सर्व वयोगटातील लोक, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 5 वर्षांखालील मुलांवर होतो. म्हणून, 2018 पासून 7 जून रोजी हा विशेष दिवस साजरा करण्याची घोषणा केली गेली. खराब अन्नपासून होणारे आजार कमी करण्यासाठी तसेच अन्नसुरक्षेच्या जागतिक प्रयत्नांना बळकट करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी आणखी एक ठराव मंजूर केला आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिन संबंधित संस्था आणि सदस्य देशांच्या सहकार्याने संयुक्तपणे साजरा हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जागतिक आरोग्य संघटना जागतिक स्तरावर अन्नजन्य आजार कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा

यंदा  जागतिक अन्न सुरक्षा दिन ची थीम
जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त यंदाची थीम म्हणजे 'सुरक्षित जेवण निरोगी जीवन आज आणि उद्यासाठी ही आहे. यामध्ये सुरक्षित अन्न खाण्यावर आणि उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अन्न सुरक्षित असल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला देखील गती मिळते.

 हा दिवस का साजरा केला जातो 
हा दिवस साजरा करण्याचा मूळ हेतू लोकांना दूषित आहाराबद्दल जागरूक करणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, दरवर्षी 4 लाख 20 हजार लोक केवळ दूषित अन्न सेवन केल्यामुळे मरतात. यासह, मुले दूषित किंवा जीवाणूंनी भरलेले अन्न खाल्ल्यामुळे देखील मरतात. अहवालानुसार यामुळे दरवर्षी सुमारे 1 लाख 25 हजार मुलांचा मृत्यू होतो.

संबंधित बातम्या