बोरीत पट्टेरी वाघाचा संचार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

बोरी:बोरीत पट्टेरी वाघाचा हैदोस बंदोबस्त करण्याची मागणी 

बोरी:बोरीत पट्टेरी वाघाचा हैदोस बंदोबस्त करण्याची मागणी 

वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत भितीचे वातावरण
तन्नामुळे शिरशिरेच्या भरवस्तीत मंगळवारी १४ रोजीच्या मध्यरात्री पट्टेरी वाघाने हैदोस घातल्याने येथील नागरिकांत घबराट पसरली आहे.वनविभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोना करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
शिरशिरे तन्नामुळे भागात राहणारे बागायतदार व बोरीचे माजी सरपंच चंद्रू गावडे यांच्या घराशेजारी रात्री १२.१० वाजण्याच्या दरम्यान पट्टेरी वाघाने हैदोस घातला. चंद्रू गावडे यांच्या गोठ्यातील गायीचे अचानक हंबरणे आणि कुत्र्याचे जोरजोराने भुंकणे ऐकून चंद्रू गावडेंना परिसरात वाघ आल्याचा संशय आला.ते विचेरीच्या उजेडात आपल्या गोठ्यात जात असताना पट्टेरी वाघाने येथून पळ काढल्याचे श्री.गावडे यांनी सांगितले. तसेच आपल्या शेतात हिरवे गवत लावले आहे. त्यामध्ये पट्टेरी वाघाने धूडगूस घातला,असे ते म्हणाले.
या वस्तीतील बागायतीत पुरण नामक जनावरांचा संसर्ग असतो. या पट्टेरी वाघाने जनावरांना इजा करण्यापूर्वीच चंद्रू गावडे या ठिकाणी पोचल्याने मोठा अनर्थ टळला.आज चंद्रू गावडे यांनी फोंडा येथील वनखात्याच्या कचेरीत जाऊन यासंबंधीची माहिती सांगितली.परंतु वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवून न घेता तुम्ही लेखी तक्रार द्या असे गावडे यांना सांगितले.वनखात्याला शिरशिरे भागात पट्टेरी वाघ वावरत असल्याची कल्पना दिल्यावर या खात्याच्या अधिकाऱ्यांनी पट्टेरी वाघाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण बोरी आणि जवळपासच्या गावातील रानात काही अज्ञात शिकारी रानडुक्कर पकडण्यासाठी फासे रचून ठेवतात.त्यात बिबटे सापडल्याने त्यांना मारून त्यांची हाडे, मास, दात आणि कातडी परस्पर विकून अनेकांनी पैसे कमावले.तसेच सुकन्नेच्या पाणवठ्याच्या ठिकाणी दोन वर्षांमागे याच दिवसात एका बिबट्यावर बंदुकीची गोळी झाडून मारून टाकले होते. या पट्टेरी वाघापासून माणसे आणि जनावरांना धोका पोचण्याअगोदर अज्ञात शिकाऱ्याकडून या पट्टेरी वाघाच्या जीवालाच अधिक धोका पोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.वन खात्याने इतर गावात घडले तसे प्रकार घडू न देता या पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच चंद्रू गावडे यांनी केली आहे.

अहो सांगा आम्ही कसे जगायचे ? सांगा ना .!
दरम्यान, सिध्दनाथ पर्वत परिसर व येथील बागायतीत करसंगे, बाळंगाळ परिसरात गवे रेडे, रानडुक्कर, मेरू व अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर भरवस्तीत येताच, असे येथील जागृत नागरिक व सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार प्रभुदेसाई, दत्तप्रसाद देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या