ब्रह्मकुमारीजतर्फे महाशिवरात्री महोत्सव व व्याख्यानमालेचे आयोजन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

ब्रह्मकुमारीजतर्फे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला

व्याख्यानमालेत नैराश्‍येवर मात करण्याच्या तसेच नैराश्‍य टाळण्याच्या सोप्या पद्धती व उपाय या विषयावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत मान्यवर व्याख्यानमालेच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील.

पणजी :  ब्रह्मकुमारीज संस्थेतर्फे गुरुवार २० रोजी दयानंद बांदोडकर फुटबॉल मैदान, कांपाल, पणजी येथे दुपारी ४ वाजता महाशिवरात्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्री महोत्सवानिमित्त १०८ शिवलिंग दर्शन सोहळाही होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल सत्यपाल मलिक, सन्माननीय अतिथी या नात्याने केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. राज्याचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो तसेच माहिती तंत्रज्ञान खात्याच्या मंत्री जेनिफर मोन्सेरात हे मान्यवर विशेष आमंत्रित या नात्याने उपस्थित राहतील.

कार्यक्रमात कॉर्पोरेट ट्रेनर, प्रेरणादायी वक्ते व समुपदेशक या नात्याने राजयोग शिक्षण व संशोधन फाऊंडेशनमध्ये कार्यरत असलेले डॉ. सचिन परब प्रमुख वक्ते या नात्याने बोलणार आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार बाबूश मोन्सेरात, प्रवीण झांट्‍ये, ज्योसुआ डिसोझा, सुभाष शिरोडकर, ग्लेन टिकलो, इजिदोर फर्नांडिस, नीळकंठ हळर्णकर तसेच पणजीचे महापौर उदय मडकईकर यांच्यासह ब्रह्मकुमारीज गोवा क्षेत्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी शोभा बहेनजी उपस्थित राहणार आहेत.

महाशिवरात्री महोत्सव व १०८ शिवलिंग दर्शन सोहळा या मुख्य कार्यक्रमांसह २० ते २६ फेब्रुवारी या ७ दिवसांच्या काळात नैराश्‍येवर मात करण्याचे सोपे उपाय या विषयावर व्याख्यानमाला होणार आहे.

संबंधित बातम्या

फोटो फीचर