पाव होणार पाच रुपये

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

मैद्याचे दर वाढले आहेत.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे.बेकरी वाल्यानी लाकडांचा साठा केला नाही.बेकरीना जळावू लाकूड पुरवठा करणार्या ट्रकांना वहातुक परवाना नसल्याने लाकूड मिळत नाही.पुर्वी एक ट्रक १५ हजार रु. मिळायचा आज २० हजार रु. किमंत झाली आहे.

नावेली
पावाचे दर ५ रु. होणार गेल्या पाच वर्षात लोकाच्या तसेच बिगर सरकारी संघटनाकडुन विरोध होत असल्याने पावाचे दर वाढवण्यात आले नव्हते मात्र,आता लॉकडाऊन मुळे बेकर्सना पावाचे दर परवडत नसल्याने कुठल्याही क्षणी पावाचे दर वाढू शकतात असा इशारा ऑल गोवा बेकर्स एन्ड कॉन्फेक्शनर्स असोसिएशनाचे अध्यक्ष पिटर फर्नाडीस यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मैद्याचे दर वाढले आहेत.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे.बेकरी वाल्यानी लाकडांचा साठा केला नाही.बेकरीना जळावू लाकूड पुरवठा करणार्या ट्रकांना वहातुक परवाना नसल्याने लाकूड मिळत नाही.पुर्वी एक ट्रक १५ हजार रु. मिळायचा आज २० हजार रु. किमंत झाली आहे.
काही बेकरी वाल्यांनी बेकरी बंद केल्यात.बेकरीमध्ये काम करणारे कामगार मालकांना न सांगताच गावाला गेले.काहीजण रेल्वे, बससेवा सुरू होण्याची वाट पहात आहेत.त्या मूळे बेकरी व्यवसाय करणार्यांना कामासाठी कामगार मिळतील काय नाही या बद्दल मनात  भिती आहे.
सरकारने खनिज व्यवसायावर अवलंबून असलेले ट्रक मालक, बोट ट्रॉलर मालक,पारंपारिक मच्छीमार,शेतकरयांना काजू, अळसाणे,नारळाला आधारभूत किंमत दिली जाते.बेकर्सांची स्थिती खूप वाईट आहे.बेकर्स सध्या कामगारांचे पगार देऊशकत नाहीत.त्यामुळे बेकर्सना सपोर्ट प्ेकेज द्यावे अशी मागणी फर्नाडीस यांनी केली आहे.
काही बेकर्सांची मूले विदेशात नोकरीला आहेत तर काही जहाजावर नोकरीला आहेत त्याना गोव्यात सुरक्षित गोव्यात आणावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
बेकर्सना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.कारण कामगार मुळ गावी गेल्याने सर्वचजण घरोघरी जाऊन सेवा देऊ शकत नाहीत.आम्ही सामाजिक अंतर, हातमोजे व मास्काचा वापर करू असे फर्नाडीस यांनी म्हटले आहे

संबंधित बातम्या