दोन पूल दोन राज्याचा व तालुक्याचा दुवा ठरत आहे. 

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

मोरजी:मांद्रे मतदारसंघातील किरणपाणी-आरोंदा आणि चोपडे-शिवोली हे दोन पूल दोन तालुक्याचा आणि दोन राज्याचा दुवा ठरत आहेत.या दोन्ही पुलांचा मांद्रे मतदारसंघाच्या आणि पर्यायाने पेडणे तालुक्याच्या विकासाला हातभार लागत आहे.या दोन्ही पुलामुळे विकास होत आहे, तर अर्धवट असलेल्या केरी-तेरेखोल पुलामुळे तेरेखोलचा विकास खुंटला आहे.या ठिकाणी पूल नसल्यामुळे वीज व जलवाहिनी तेरेखोल गावात आजपर्यंत सरकारला नेता आलेली नाही.चोपडे-शिवोली व किरणपाणी-आरोंदा हे दोन पूल मांद्रे मतदारसंघाला जोडणारे महत्त्वपूर्ण पूल आहेत.हे पूल दळण-वळणाच्या सोयी जोडण्याचे महत्त्वाचे काम करत असतात.शिवाय या पुलामुळेच परिसर

मोरजी:मांद्रे मतदारसंघातील किरणपाणी-आरोंदा आणि चोपडे-शिवोली हे दोन पूल दोन तालुक्याचा आणि दोन राज्याचा दुवा ठरत आहेत.या दोन्ही पुलांचा मांद्रे मतदारसंघाच्या आणि पर्यायाने पेडणे तालुक्याच्या विकासाला हातभार लागत आहे.या दोन्ही पुलामुळे विकास होत आहे, तर अर्धवट असलेल्या केरी-तेरेखोल पुलामुळे तेरेखोलचा विकास खुंटला आहे.या ठिकाणी पूल नसल्यामुळे वीज व जलवाहिनी तेरेखोल गावात आजपर्यंत सरकारला नेता आलेली नाही.चोपडे-शिवोली व किरणपाणी-आरोंदा हे दोन पूल मांद्रे मतदारसंघाला जोडणारे महत्त्वपूर्ण पूल आहेत.हे पूल दळण-वळणाच्या सोयी जोडण्याचे महत्त्वाचे काम करत असतात.शिवाय या पुलामुळेच परिसराचा, गावाचा आणि तालुक्याचा पर्यायाने राज्याचा विकास होत आहे.

चोपडे शिवोली पूल.
चोपडे शिवोली हा शापोरा नदीवरील असून, हा पूल सतरा वर्षांपूर्वी पूर्ण झाला आहे.बार्देश व पेडणे या दोन तालुक्यांना जोडण्याचे महत्त्वाचे काम या पुलामुळे झाले आहे. शापोरा नदीवर हा पूल झाल्यानंतर परिसराच्या विकासाला हात भर लागला. राज्यातील हा महत्त्वाचा पूल आहे.दुचाकीवरून वेगाने गेलो तरीही या पुलावर मागे बसलेल्याना धक्के बसत नाहीत. हा पूल उत्तमरित्या तयार करण्यात आला आहे.तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे या पुलाचे राज्याला आपल्या भाषणातून पूल कसा असावा तर तो चोपडे शिवोली पुलाचे नेहमी उदाहरण देत असत.

मांद्रे ग्रामसुधार समिती अन् किशोर शेट मांद्रेकर यांचे योगदान
चोपडे शिवोली पूल होत नसल्याने नागरिकांना पूर्णपणे चोपडे-शिवोली फेरी बोटीवर अवलंबून रहावे लागत असे.पूल होत नसल्याने शिवोली बसस्थानकावर तर प्रवाशांना शिवोलीच्या बसेस वेठीस धरण्याचे काम करत होते.पूल विलंबास शिवोली बसस्थानकावर असलेल्या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचा विरोध होता.पूल झाला तर आमच्या व्यवसायावर गदा येईल. पुलामुळे थेट बसेस पुलावरून म्हापसा जाईल आणि आम्हाला कुणी ग्राहक मिळणार नाही अशी कैफियत शिवोली मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसमोर कैफियत मांडली जायची. त्यावेळचे आमदार बाजू ऐकून घेऊन पुलाचे काम संथगतीने चालण्यास हातभार लावत असत. परंतु भाजपचे सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी चोपडे-शिवोली पुलाचे भाग्य उजळवून टाकले. तत्पूर्वी, चोपडे-शिवोली हा पूल होत नसल्याने मांद्रे ग्रामसुधार समितीने आवाज उठवला होता. त्या पलीकडे जावून पत्रकार किशोर शेट मांद्रेकर यांनी या पुलाचे काम रखडले म्हणून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.न्यायालयाने याची दाखल घेऊन सरकारला पुलाचे काम लवकर मार्गी लावण्याचा आदेश दिला आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या कारकिर्दीत पूल पूर्ण करून ४ जुलै २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वाढदिनी हा पूल खुला केला. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत होते.आता हा पूल बार्देश आणि पेडणे या दोन तालुक्यांसाठी दुवा ठरत आहे.

१५ व्या वित्त आयोग गोवा दौऱ्यावर

किरणपाणी आरोंदा पूल अन् महाराष्ट्र
मांद्रे मतदारसंघातील दुसरा महत्त्वाचा पूल म्हणजे किरणपाणी-आरोंदा पूल.या पुलाने महाराष्ट्र राज्याला जोडण्याचे काम केले आहे. या पुलाची मागणी ४० वर्षांपासून सुरू होती.सरकारकडून योग्य सहकार्य मिळत नव्हते. हा पूल व्हावा, यासाठी तत्कालीन केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, माजी मंत्री संगीता परब, तत्कालीन आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बरेच प्रयत्न केले. राज्य सरकार आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांनी मिळून पुलाला येणारा खर्च पन्नास पन्नास टक्के उचलावा असा करार झाला होता. मात्र, राज्य सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने याही पुलाचे काम किमान दहा वर्षे रखडले.तोपर्यंत नागरिकांना किरणपाणी-आरोंदा या फेरीबोटवर अवलंबून रहावे लागायचे. पावसाळ्याततर फेरीबोट सेवा वादळी वाऱ्यात भरकटत जाण्याच्या प्रकारात वाढ होत होती.पूल होण्यापूर्वी फेरीबोट आणि होडीतून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत होता. या पुलाचा उद्‍घाटन सोहळा २०१२ साली लक्ष्मीकांत पार्सेकर हे आरोग्यमंत्री असताना महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले.

संबंधित बातम्या