गोव्‍यातील नेमबाजांना भवितव्‍य

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पणजी:नेमबाजीच्‍या बाबतीत भारताचा नावलौकिक जगात आहे.अन्‍य देशांपेक्षा आपली राष्ट्रीय विक्रमांची कामगिरी अव्वल आहे.गोव्‍यातही अत्‍यंत चांगले कौशल्‍यगुण आणि क्षमता असणारी मुले आहेत.नेमबाजी म्‍हणजेच रायफल शुटिंगच्‍या बाबतीत योग्‍य साधनसुविधा उपलब्ध झाल्या, तर गोव्यातील नेमबाज आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्‍चितच चमकतील.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने राज्‍यात तालुकास्‍तरीय नेमबाजी प्रशिक्षण केंद्रे उभी राहिल्यास भविष्यात नेमबाजीत अधिक खेळाडू सहभागी होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.नेमबाजी क्रीडा प्रकाराचा सर्व स्तरावर प्रसार व्हायला हवा, जेणेकरून अधिकाधिक खेळाडू आपल्याला सहभा

पणजी:नेमबाजीच्‍या बाबतीत भारताचा नावलौकिक जगात आहे.अन्‍य देशांपेक्षा आपली राष्ट्रीय विक्रमांची कामगिरी अव्वल आहे.गोव्‍यातही अत्‍यंत चांगले कौशल्‍यगुण आणि क्षमता असणारी मुले आहेत.नेमबाजी म्‍हणजेच रायफल शुटिंगच्‍या बाबतीत योग्‍य साधनसुविधा उपलब्ध झाल्या, तर गोव्यातील नेमबाज आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्‍चितच चमकतील.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने राज्‍यात तालुकास्‍तरीय नेमबाजी प्रशिक्षण केंद्रे उभी राहिल्यास भविष्यात नेमबाजीत अधिक खेळाडू सहभागी होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.नेमबाजी क्रीडा प्रकाराचा सर्व स्तरावर प्रसार व्हायला हवा, जेणेकरून अधिकाधिक खेळाडू आपल्याला सहभागी झालेले दिसून येतील, असा विश्‍‍वास आंतरराष्‍ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक, राष्‍ट्रीय रायफल असोसिएशनचे सचिव ॲड. मेघश्‍‍याम (विक्रम) भांगले यांनी ‘कॉफी विथ गोमन्‍तक’मध्‍ये बोलताना व्‍यक्‍त केला.
गुरुवारी दै. ‘गोमन्‍तक’च्‍या कार्यालयात आयोजित केलेल्‍या ‘कॉफी विथ गोमन्‍तक’मध्‍ये त्‍यांनी नेमबाजी क्रीडा प्रकार आणि भारताची प्रगती यावर विस्तृतपणे विश्‍लेषण केले.शिवाय गोव्यातही नेमबाजी क्रीडा प्रकाराला चांगले दिवस येतील, अशी खात्री व्यक्त करताना इथल्या क्रीडापटूंकडे चांगले ‘टॅलंट’ असल्याचे ते म्हणाले.

नेमबाजीमुळे एकाग्रता वाढते
नेमबाजीमुळे एकाग्रता वाढते.मी अनेक मुले पाहिली आहेत, जी नेमबाजीही करतात आणि शिक्षणातही अव्‍वल आहेत.हल्लीच्या काळात मातीमधील खेळ हरवले आहेत आणि त्‍यामुळे मुले सुदृढ राहिलेली नाहीत. पालकांनीही आता मुलांना ज्‍या खेळात आवड आहे, तो खेळ पुढे त्‍यांचे करिअर घडवू शकतो, हे लक्षात घ्‍यावे.क्रीडाक्षेत्रातही रोजगाराच्या अनेक संधी आहेत.त्यामुळे क्रीडापटूंना आपले भविष्य उज्ज्वल बनवता येते. पालकांना क्रीडाक्षेत्राविषयी जवळीक वाटायची असेल तर सरकारने विद्यार्थ्यांसाठी खास योजना राबविल्‍या पाहिजेत. जेणेकरून पालक आपल्या मुलांना क्रीडाक्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करतील, असेही त्‍यांनी सांगितले.

पर्रीकरांच्‍या सहकार्यातून घडली ‘तेजस्‍विनी’
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विक्रम केलेल्या आणि यावेळी ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवलेल्या तेजस्‍विनी सावंत हिने नेमबाजीत भविष्य घडवताना खडतर आव्हानांचा सामना करावा लागला.जेव्‍हा जागतिक स्‍पर्धेत सहभागी होण्यासाठी ती देशाबाहेर जाणार होती, तेव्‍हा तिला आर्थिक मदतीची गरज होती.गोव्याचे तत्‍कालीन मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही त्यावेळी तेजस्विनीला सहाय्य केले.तो तेजस्‍विनीचा टर्निंग पॉईंट ठरला. तेजस्‍विनी आज महाराष्‍ट्राच्‍या क्रीडा खात्‍यात उपसंचालक म्‍हणून कार्यरत आहेत.त्‍यावेळी पर्रीकर यांनी केलेली मदत एका जागतिक खेळाडूला पुढे येण्‍यासाठी हातभार लावणारी ठरली, अशी आठवणही यावेळी ॲड. भांगले यांनी सांगितली.
 

संबंधित बातम्या