राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना आणणार परत

dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

वैयक्तिक, व्यावसायिक वा इतर कामासाठी भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी भेटीवर गेलेले अनेक गोमंतकीय कोरोनाच्या लॉकडाऊननंतर तेथेच अडकून पडले आहेत. आपल्या घरी परतण्याची आस त्यांना लागली आहे. सरकारने अशा गोमंतकीयांना घरी परतण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे.

मडगाव

वैयक्तिक, व्यावसायिक वा इतर कामासाठी भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी भेटीवर गेलेले अनेक गोमंतकीय कोरोनाच्या लॉकडाऊननंतर तेथेच अडकून पडले आहेत. आपल्या घरी परतण्याची आस त्यांना लागली आहे. सरकारने अशा गोमंतकीयांना घरी परतण्यासाठी परवानगी देणे गरजेचे असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारशी बोलून आवश्यक व्यवस्था करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
गोवा सरकारने गोमंतकीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे त्याचे मी स्वागत करतो व हे विद्यार्थी लवकरात लवकर सुखरूप आपापल्या घरी येतील, असा विश्वास व्यक्त करतो, असे कामत यांनी सांगितले.
असंख्य गोमंतकीय आज आपल्या देशातच कित्येक ठिकाणी अडकले असून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ते आपल्या घरी परतू शकले नाहीत. घरातील कर्ता पुरूष वा स्त्री आजारपणात वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई व इतर ठिकाणी गेलेले रुग्ण व त्यांचे सोबती, पत्रकार, खेळाडू अशा अनेकांचा यात समावेश आहे. हे सर्वजण गोव्यात परतण्यासाठी सरकारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. बाळंतपणासाठी गेलेल्या वा गोव्यात येऊ पाहणाऱ्या अनेक महिला गोव्यात येण्याची वाट पाहात आहेत, असे कामत यांनी सांगितले.
यातल्या अनेकजणांनी माझ्याशी संपर्क साधून सरकारकडे त्यांच्या परतण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्याची विनंती केली आहे. दर्यावर्दींना परत आणण्यासाठी सरकारचा शेवटी निर्णय झाला व मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जाहीर केल्या. त्याचप्रमाणे सरकारने आता आपल्या देशातच अडकलेल्या गोमंतकीयांना घरी परतण्यासाठी पावले उचलावीत व योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी कामत यांनी केली.

 

संबंधित बातम्या