अधिवेशनासाठी ८१४ प्रश्‍न   

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पणजी:अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी
आमदारांकडून ८१४ प्रश्‍न
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ ते ७ फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याने त्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांकडून ८१४ प्रश्‍न विधीमंडळ खात्याकडे आले आहेत. यामध्ये २०५ तारांकित तर ६०९ अतारांकित प्रश्‍नांचा समावेश आहे.याव्यतिरिक्त पाच खासगी ठराव आहेत अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली.

या पाचदिवशीय अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देण्यात आलेले नसल्याचा आरोप पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी केला आहे.या अधिवेशनामध्ये राज्याची ढासळलेली अर्थव्यवस्था, म्हादई व खाण प्रश्‍न, वाघांचा विषबाधेने झालेला मृत्यू व आदिवासींचे पुनर्वसन करण्यात झालेला विलंब, नागरिक दुरुस्ती कायदा (सीएए) व एनआरए, रस्त्यांवरील खड्डे तसेच लोकायुक्तने खाणसंदर्भात केलेल्या शिफारसीनुसार तक्रार दाखल करणे असे अनेक विषयांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत.या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.खाणबंदीमुळे मुख्यमंत्री खाणग्रस्तांसाठी कोणती मदत या अर्थसंकल्पात मांडणार आहेत याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

आर्थिक साक्षरताबद्दलच्या समुदाय पोहोच कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

संबंधित बातम्या