जेटी बोगदा येथे उघड्या गटारात म्हैस पडली

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

मुरगाव:जेटी बोगदा येथे उघड्या गटारात म्हैस पडून जखमी
गोवा साधन विकास महामंडळाच्या दिशाहीन कारभाराचा फटका मुरगाव मतदारसंघातील जनतेला बसत आहे. रस्ता रुंदीकरण आणि सुशोभीकरण हा प्रकल्प सध्यातरी पांढरा हत्ती बनला असून या रस्त्याच्या कडेला बांधून ठेवलेले उघडे गटार जीवघेणे बनले आहेत.काल एका घटनेत जेटी बोगदा येथे उघड्या गटारात म्हैस पडून जखमी झाल्याची घटना घडली.

सहा वर्षांपूर्वी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने बायणा ते सडा-जेटी-बोगदापर्यंतच्या ९.३० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा डंका पेटविला.तत्कालीन मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर, तत्कालीन महामंडळाचे अध्यक्ष तथा विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ सडा बस स्थानकावर करण्यात आला.अवघ्या दीड वर्षात हा प्रकल्प साकार करू अशी वल्गना करण्यात आली.परंतु सहा वर्षे उलटली तरी अद्याप प्रकल्पाचे ३० टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही.
सुमारे ३२ कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प अडकलेला आहे.या रस्त्याच्या कडेला एक मीटर रुंदीचे गटार बांधले आहेत.काही ठिकाणी गटार उघडे ठेवले आहे.ते सर्वांसाठी धोकादायक ठरत आहेत.या गटारावरील लोखंडी सळ्या प्राणघातक ठरत असून गेल्यावर्षी एका मोटरसायकलस्वाराच्या पायात या सळ्या आरपार घुसण्याची घटना घडली होती.या घटनेनंतर काल या उघड्या ठेवलेल्या गटारात म्हैस पडण्याची घटना घडली.मोठ्या कष्टाने म्हैस गटारातून बाहेर आली, पण तीला बरीच जखम झाली होती.
गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने हा प्रकल्प पूर्ण करण्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.स्थानिक आमदार मिलिंद नाईक यांचाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.परिणामी हा ३२ कोटी रूपये खर्चाचा प्रकल्प सद्यस्थितीत पांढरा हत्ती बनला आहे.

विशेष फेरींसाठी सुधारित दरांचे आदेश निघूनही अंमलबजावणी नाही.

संबंधित बातम्या