राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर अपघात

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मालपेत एसटी बसची ट्रकला धडक

पणजी-कुरुंडवाड बसमधील तुये येथील दोन प्रवासी जमखी

मालपे येथे ट्रकला धडक दिलेली अपघातग्रस्त बस.

पेडणे : मालपे येथे आज सकाळी सोडदहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंप जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर पणजीहून कोल्हापूर येथे जात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसने टिप्पर ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले तर एसटी बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.

उपलब्ध माहितीनुसार पणजी- कोल्हापूर या मार्गावर पणजी- कुरुंदवाड (एम. एच १४ बीटी -३४१८) ही एसटी बस सकाळी पणजीहून कोल्हापूरकडे येथे जात होती. मालपे येथे सकाळी १०.१५ च्या दरम्यान ही बस पोचली असता बसच्या पुढे रिकामी जात असलेल्या एम.एच ०७ सी- ६३ ५४ या क्रमाकांच्या ट्रकला एसटी बसने मागून धडक दिली.

यात बसच्या दर्शन भागाचे नुकसान झाले तर वंदना सावंत वय (६०) सावंतवाडी व दत्ताराम आर्लेकर (४५) तुये हे दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. ट्रकचे किरकोळ नुकसान झाले. जखमी दोन्ही प्रवाशाना पेडणे सरकारी इस्पितळात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

गोवा मानवाधिकार आयोगाचा कारोभार यांच्या हाती

पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश येशी यांनी अपघाताचा पंचनामा करून एसटी बसचालकावर गुन्हा नोंद केला.

 

संबंधित बातम्या