खासदार निधीतून  बालभवनसाठी बस

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

खासदार निधीतून 
बालभवनसाठी बस

पणजी,  ः मुलांनी शिक्षण घ्‍यावे आणि शिक्षणाचा अधिक जोमाने राज्‍यात प्रचार तसेच प्रसार व्‍हावा, म्‍हणून खासदार विनय तेंडुलकर यांनी खासदार फंडातील निधीचा वापर करून पणजी येथील बालभवनमधील विद्यार्थ्यांसाठी बस दिली. पणजी बालभवनसमोर पार पडलेल्‍या कार्यक्रमात खा. विनय तेंडुलकर आणि बालभवनच्‍या अध्‍यक्ष शीतल नाईक यांच्‍या उपस्‍थितीत ही गाडी बालभवनला देण्‍यात आली. 

अनेक दिवसांपुर्वी बालभवनच्‍या विद्यार्थ्यांसाठी गाडी आवश्‍‍यक असल्‍याने ती देण्‍यात यावी, अशी मागणी आमच्‍याकडे बालभवन मंडळाकडून करण्‍यात आली होती. त्‍यामुळे मुलांच्‍या भविष्‍याचा विचार करून आम्‍ही खासदार फंडातील सुमारे १४ लाख रूपये खर्च करून ही गाडी बालभवनला देण्‍यात आली आहे. भविष्‍यातही मुलांच्‍या कल्‍याणासाठी आम्‍ही अशाप्रकारचे सकारात्‍मक निर्णय घेणार असल्‍याचे खासदार तेंडुलकर म्‍हणाले. 
दक्षिण गोव्‍यातील अनेक गावांमध्‍ये बालभवन नाहीत, मात्र येथील मुलांच्‍यात बालभवनबाबत मोठे आकर्षण असल्‍याने आम्‍ही या व्‍हॅनचा वापर मोबाईल व्‍हॅनप्रमाणे करीत या मुलांपर्यंत शिक्षणाचा प्रचार करण्‍याचे आमचे ध्‍येय असल्‍याचे मत शीतल नाईक यांनी व्‍यक्‍त केले. 
यावेळी बालभवनमधील इतर शिक्षक आणि विद्यार्थीही उपस्‍थित होते.  

संबंधित बातम्या