नागरिकत्व’ कायदा समर्थनार्थ २ रोजी रॅली :राजेंद्र आर्लेकर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

दहा हजार नागरिक सहभागी होणार.तालुक्यातील भाजपच्या चारही आमदारांचा या रॅलीला पाठिंबा असल्याची माहिती माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुरगाव: वास्कोत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या रॅलीत २ फेब्रुवारी रोजी मुरगाव तालुक्यातील दहा हजार देशभक्त नागरिक सहभागी होणार आहेत रविवारी २ फेब्रुवारी रोजी मुंडवेल वास्को येथील कदंब बसस्थानक येथून दुपारी ३ वाजता रॅलीला प्रारंभ करण्यात येणार आहे.तेथून मुरगाव पालिका इमारतीसमोरील चौकात रॅलीची जाहीर सभेने सांगता होणार आहे.

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणल्यापासून या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. गोव्यातही विरोध केला जात आहे.त्यासाठी विरोधक मोठ्या रॅली काढून किंवा जाहीर सभा घेऊन कायद्याच्या विरोधात वातावरण तापवित आहे.वास्कोतही गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात विरोधकांनी वातावरण तापविले आहे.याची दखल घेऊन कायद्याचे समर्थन करणाऱ्या देशभक्त नागरिकांनी पुढाकार घेऊन समर्थनार्थ रॅली काढण्याची घोषणा केली आहे.

रॅलीत काहीच देशभक्त नागरिक सहभागी होतील, असे दिसून येत होते.पण जसजसा रॅलीचा दिवस जवळ येऊन ठेपला आणि मुरगाव तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभू लागला त्यावरुन या रॅलीत दहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, असे स्पष्ट झाले आहे, असे आर्लेकर म्हणाले.

वास्कोत काढण्‍यात येणाऱ्या या रॅलीत सर्व पक्षीय नागरिक सहभागी होणार आहेत.हिंदूबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन नागरिकही रॅलीत सहभागी होणार असल्याचे आर्लेकर यांनी पत्रकारांना सांगितले.पत्रकार परिषदेस जयंत जाधव, प्रशांत नार्वेकर, संजय कोरगांवकर, शाम नाईक, जितेंद्र तानावडे, किरण नाईक, तिवारी उपस्थित होते.

 

 

 

मामलेदार कार्यालयात दलालांना प्रोत्साहन नाही.

संबंधित बातम्या