कळंगुट येथे गांजासह दोघे गजाआड 

dainik gomantak
मंगळवार, 28 एप्रिल 2020

कळंगुट येथे गांजासह दोघे गजाआड

पणजी,

कळंगुट पोलिसांनी काल रात्री उशिरा लेनी फर्नांडिस (२५) व मनोहर धारगळकर (२६) या दोघांना गांजाप्रकरणी अटक केली. दुचाकीवरून हे दोघे जात असताना संशयास्पद हालचालीवरून त्याना अडविण्यात आले. कळंगुट पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता गांजा सापडला. याप्रकरणी दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या वर्षातील अंमलीपदार्थविषयक ९ वे प्रकरण असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिली. 

 

 

संबंधित बातम्या