प्रचारासाठी उमेदवारांचे ‘घर घर चलो’ला प्राधान्य

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार व पक्षांचे उमेदवार यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. अद्याप जाहीर सभांना सुरवात झालेली नाही. येत्या रविवारपासून प्रचाराचे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार व पक्षांचे उमेदवार यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. अद्याप जाहीर सभांना सुरवात झालेली नाही. येत्या रविवारपासून प्रचाराचे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भाजपने आज मतदारसंघ प्रभारींची बैठक प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्‍या अध्यक्षतेखाली घेतली. त्यांनी या बैठकीत मतदारसंघातील प्रचारांतील बलस्थाने व उणीवांचा आढावा घेत उणीवा दूर करण्यासाठी उपाययोजना सूचवल्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आज दक्षिण गोव्यात होते. कालपर्यंत त्यांनी उत्तर गोवा दौरा केला होता. त्यांनी आज प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्यावर भर दिला.

मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधत मांद्रे गाठले. मगोने सांतआंद्रे मतदारसंघात पक्ष संघटनेची फेररचना करत विधानसभा निवडणुकीची तयारी पक्षाने आतापासून सुरू केल्याचे दाखवून दिले. मंत्री मायकल लोबो उद्या सकाळी ९ वाजता दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करणार आहेत.

संबंधित बातम्या