मयेत अपक्षाकडून भाजपच्या नावाचा वापर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

डिचोली: मये जिल्हा पंचायत मतदारसंघातून विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. तरीदेखील या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेले प्रेमेंद्र शेट हे भाजपच्या नावाचा वापर करून मतदारसंघात प्रचार करीत आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्‍ता प्रेमानंद महांबरे यांनी आज (मंगळवारी) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

डिचोली: मये जिल्हा पंचायत मतदारसंघातून विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. तरीदेखील या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेले प्रेमेंद्र शेट हे भाजपच्या नावाचा वापर करून मतदारसंघात प्रचार करीत आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्‍ता प्रेमानंद महांबरे यांनी आज (मंगळवारी) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

प्रचारावेळी प्रेमेंद्र शेट हे भाजपच्या नावाचा वापर करीत आहेत, त्याच्यावर मतदारांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे प्रेमानंद महांबरे यांनी स्पष्ट करून, प्रेमेंद्र शेट यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळेच त्यांचे बंधू तथा माजी सभापती अनंत शेट यांना गत विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने उमेदवारी नाकारली, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. डिचोली येथे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या कार्यालयात घेतलेल्या या पत्रकार परिषदेस मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, उपाध्यक्ष कृष्णा परब, सरचिटणीस विश्वास चोडणकर, संदीप पार्सेकर आणि मयेची सरपंच उर्वी मसूरकर उपस्थित होते.

मये आणि कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनुक्रमे शंकर चोडणकर आणि महेश सावंत यांचा नियोजन आणि शिस्तबद्धरीत्या प्रचार चालू आहे. भाजप मंडळ, बुथ समित्या, युवा मोर्चा, महिला मोर्चा आदी भाजपचे कार्यकर्ते प्रचारकार्यात व्यस्त आहेत. भाजपच्या विकासकामांचा धडाका आणि दोन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघातील प्रचारकार्य पाहता दोन्ही मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांचा विजयी निश्‍चित आहे, असा विश्वास मये भाजप मंडळाने व्यक्‍त केला.

मुख्यमंत्री आज मयेत!

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उद्या (ता.११) या भागाचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या उपस्थितीत मये आणि कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. दुपारी ३.१५ वा. माडेल येथून मुख्यमंत्र्यांच्या मये जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. नंतर देवगी, पांडववाडा येथे मतदारांशी संपर्क साधल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत नार्वे, मये आणि शिरगाव भागाला भेट देणार आहेत. ६.३० वा. पिळगाव येथून मुख्यमंत्री डॉ. सावंत कारापूर-सर्वण जिल्हा पंचायत मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. रात्री ९ वा. कारापूर-तिस्क येथील सावंत सभागृहात होणाऱ्या बैठकीने या दौऱ्याची सांगता होईल, अशी माहिती श्री. महांबरे यांनी दिली.

संबंधित बातम्या