काणकोणचे महाविद्यालय देशात ३७ वे

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

महाविद्यालयाला ७०० गुणापैकी परिक्षण केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात ५०७ गुण मिळाले आहेत.या महाविद्यालयाची स्थापना होऊन २७ वर्षे झाली आहेत

सुभाष महाले

काणकोण

देळे-काणकोण येथील ज्ञान प्रबोधिनी मडळ संचलित श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर३७वे राज्य स्तरावर सहावे मानांकन प्राप्त झाले आहे.महाविद्यालयाला ७०० गुणापैकी परिक्षण केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात ५०७ गुण मिळाले आहेत.या महाविद्यालयाची स्थापना होऊन २७ वर्षे झाली आहेत मात्र अवघ्या काही वर्षांतच या ग्रामीण भागातील महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.राष्ट्रीय स्तरावर स्वायत्तता नसलेल्या महाविद्यालयाची वेगवेगळ्या सहा निकषावर पडताळणी केली जाते. त्यामध्ये प्राध्यापक वर्गाची क्षमता(२०० गुण),प्राध्यापक वर्गासाठी कल्याणकारी योजना,(१००गुण)अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्र,(१००गुण), प्लेसमेंट(१००गुण) साधन सुविधा(१०० गुण)नेतृत्व आणि मार्गदर्शन(गूण१००गुण) श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाला ७०० पैकी ५०७ गुण प्राप्त करण्यास यश आले आहे.महाविद्यालय प्रथमच अशा प्रकारच्या राष्ट्रीय मानांकन योजनेत सहभागी झाले आहे. गेल्या वर्षी इन इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेक्षणात राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाला १५० मानांकन मिळाले होते.विद्याप्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष रामदास माजाळकर,उपाध्यक्ष चेतन देसाई, खजिनदार राजेंद्र देसाई,सचिव  के.बी.गावकर व मंडळाचे अन्य सदस्याच्या सहकार्यामुळे राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाला हे यश प्राप्त झाल्याचे प्राचार्य डॉ.मनोज कामत यांनी सांगितले.

....राज्यात कार्मेल कॉलेजला पहिले मानांकन...

राज्यात नुवे येथील कार्मेल कॉलेजला पहिले व राष्ट्रीय स्तरावर ११वे मानांकन प्राप्त झाले आहे.त्याखालोखाल नावेली येथील रोझरी कॉलेजला राज्यात दुसरे व राष्ट्रीय स्तरावर १३वे,सेंट झेव्हियर व फादर आग्नेल   कॉलेजला राज्यात तिसरे व राष्ट्रीय स्तरावर ३१ वे,बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेजला राज्यात चौथे व राष्ट्रीय स्तरावर  ३४वे,मुरगाव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजला राज्यात पांचवे व राष्ट्रीय स्तरावर ३५वे,काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन आणि  चेतन मंजू देसाई कॉलेजला राज्यात सहावे व राष्ट्रीय स्तरावर ३७वे,धेंपे कॉलेजला राज्यात सातवे व राष्ट्रीय स्तरावर ३९ वे,फोंडा येथील गोपाळ गोविंद पै रायतूरकर कॉलेजला राज्यात आठवे व राष्ट्रीय स्तरावर ४३ वे,डिचोली येथील नारायण झांट्ये कॉलेजला राज्यात नऊवे व राष्ट्रीय स्तरावर ४७वे,आल्तिनो येथील निर्मला इन्स्टिट्यूटला राज्यात दहावे व राष्ट्रीय स्तरावर ४९ वे,फोंडा येथील रवी नाईक कॉलेजला राज्यात अकरावे व राष्ट्रीय स्तरावर ५०वे,पणजी येथील एस.एस.धेंपो कॉलेजला राज्यात बारावे व राष्ट्रीय स्तरावर ५३वे,शिरोडा येथील काकुलो कॉलेजला राज्यात तेरावे व राष्ट्रीय स्तरावर ५५ वे,फोंडा येथील गोवा विद्याप्रसारक कॉलेजला राज्यात चौदावे राष्ट्रीय स्तरावर ५९ वे व मडगाव येथील विद्या प्रसारक मंडळाच्या श्री दामोदर कॉलेजला राज्यात पंधरावे व राष्ट्रीय स्तरावर ६० वे मानांकन प्राप्त झाले आहे.सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्थेने १९४६ महाविद्यालये व विद्यापिठाच्या प्राध्यापिकाचे आणि २४६७ महाविद्यालयतील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या आहेत.दिल्ली स्थित एज्युकेशन वर्ल्ड या कंपनीने हे मुल्यमापन केले आहे.

संबंधित बातम्या