काणकोणला नको बेळगावचा भाजीपाला

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

काणकोणवासियांनी बेळगावचा भाजीपाला नको अशी भूमिका घेतली आहे.

सुभाष महाले

काणकोण

बेळगावातून येणारा भाजीपाला व साहित्य काणकोणात आणले जाऊ नये अशी मागणी काणकोणच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कोविड १९ चा संसर्ग बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याने काणकोणचा बेळगावशी व्यापारी संबंध असू नये अशी आग्रही मागणी करणारे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.बेळगावसोबतचे व्यापारी व अन्य सर्व व्यवहार करोना काळात बंद करावेत. या मागणीचे निवेदन काणकोण मधील काही नागरिकानी उपजिल्हाधिकारी प्रितीदास गावकर याना दिले आहे.निवेदनावर जनार्दन भंडारी, संदेश तेलेकर,महादेव देसाई, धिरज नाईक गावकर,रजत च्यारी, वैभव भट,सर्वानंद कोमरपंत,प्रकल्प भगत याच्या सह्या आहेत.बेळगावात एकाच दिवसात कोविड १९ ची लागण झालेल्या रूग्णाची संख्या तीसच्या वर गेली आहे.राज्यात भाजी व जिवनाश्यक वस्तूची आवक बेळगावातून होते मात्र बेळगावात करोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे सावध राहणे गरजेचे आहे.पोळे तपासणी नाक्यावरून राज्यात जिवनाश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांची, चालक, वाहक व अन्य कामगाराची कसून वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे वाहनावरून येणारे सर्व परतीच्या प्रवासात गेले आहेत याची खातरजमा करणे गरजेचे आहे.करोना गोव्याच्या दारात पोचला आहे त्यासाठी ज्यास्तीत ज्यास्त काळजी घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या