काणकोणात रवींद्रभवनाचे काम रेंगाळले

Dainik Gomantak
गुरुवार, 23 एप्रिल 2020

२ जानेवारी २०१७ रोजी या महत्त्वाकांक्षी कामाला सुरवात करण्यात आली. १ जानेवारी २०१९ ला हा प्रकल्प पूर्ण करण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली होती.

काणकोण

काणकोणात दोन वर्षांपूर्वी सुरू केलेले काणकोण रवींद्रभवनाचे काम निर्धारित काळ पूर्ण होऊनही अद्याप पन्नास टक्केही काम पूर्ण झाले नाही. ते कधी पूर्ण होणार या बाबतीत सर्वजण साशंक आहेत. २ जानेवारी २०१७ रोजी या महत्त्वाकांक्षी कामाला सुरवात करण्यात आली. १ जानेवारी २०१९ ला हा प्रकल्प पूर्ण करण्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. गोवा पायाभूत साधन सुविधा महामंडळाने या कामाचे कंत्राट दिल्ली येथील कृष्णा बिल्डर या कंपनीला दिले आहे. त्या कंपनीद्वारे रवींद्र भवन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरवातीच्या काळात कामाने गती घेतली नाही.
दोन वर्षात रवींद्र भवनाचे फक्त पन्नास टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. खरे म्हणजे दोन वर्षात रवींद्र भवन प्रकल्प पूर्ण करण्याची अट कंत्राटदाराला होती. टाळेबंदी काळ संपल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी चौकशी करण्यात येणार असल्याचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या