बार्देश तालुक्‍यातील हजारो हेक्‍टर जमीन लवकरच पाण्याखाली

A_canal,in bardesh
A_canal,in bardesh

कोलवाळ:दोडामार्ग ते शिवोलीपर्यंत तिळारी प्रकल्पाचे कालव्यातून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान गोवा जलसिंचन खात्याने वर्ष १९८८ मध्ये ५९० कोटी रुपयांची निविदा मंजुर करून दोडामार्ग ते शिवोली, पेडणे व गिरीपर्यंत बार्देश तालुक्‍यात सुमारे ३८ किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या बांधकामाला सुरवात केली. वर्ष २०१९ पर्यंत कालव्याच्या बांधकामाचे ९८ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे ९११ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे कोलवाळ येथील जलसिंचन कार्यालयातील कार्यकारी अभियंता एम. के. प्रसाद यांनी सांगितले.
तिळारी पाणी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यातून दोडामार्ग ते शिवोली व पेडणे तालुका व बार्देश तालुक्‍यातील गिरीपर्यंत पाणी कालव्यातून सोडण्याची योजना तयार करण्यात आली.संपूर्ण तालुक्‍यात हरीत क्रांती घडवण्यासाठी गोवा जलसिंचन खात्याने योजना राबवण्यास सुरवात केली.तिळारी पाणी प्रकल्पातून मिळणारे पाणी दोडामार्ग ते डिचोली, अस्नोडा, थिवी, कोलवाळ, शिवोली, गिरी, साळगाव, कळंगुट, हणजूणपर्यंत थेट कालव्यातून पाणी पुरवठा करण्याची गोवा जलसिंचन खात्याची योजना राबवण्यात येत असताना बरीच वर्षे निघून गेली. गेल्या वर्षी तिळारी प्रकल्पाचे पाणी पेडणे भागात सोडण्यात आले.पीर्ण व मेणकुरे भागातील शेतकऱ्यांनी या वळवण्यात आलेल्या पाण्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी बागायती, शेती, भाज्यांचे व फुलांचे मळे, केळींची लागवड, उसाची लागवड अशा विविध उत्पादनांसाठी कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा उपयोग करण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून जलसिंचन खात्याने या वर्षी शिवोली भागाकडे तिळारी प्रकल्पाचे पाणी वळवण्यात आले आहे.बार्देश तालुक्‍यातील बस्तोडा गावाला तिळारी प्रकल्पाचे पाणी वळवण्यासाठी हळदोण्याचे आमदार ग्लेन टिकलो यांच्याजवळ बोलणी करून अस्नोड्याचे सरपंच सावियो मार्टीन्स व पंचायत मंडळाने सुमारे तीस शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वळवण्यासाठी योजना राबवण्याचे स्वप्न साकार केले आहे.२०१९ साली जलस्त्रोत खात्यातर्फे सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून बस्तोडा पंचायत क्षेत्रातील सुमारे ११४ हेक्‍टर शेतजमीन पाण्याखाली आणण्यासाठी माजी जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ करून या योजनेला मूर्त स्वरुप देण्यात आले. बस्तोडा भागातील सुमारे तीस शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक शेतापर्यंत पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जमिनीत जलवाहिनी घालून काम पूर्ण करण्यात आले आहे.
तिळारी कालव्यातून येणारे पाणी बस्तोडा तार जवळ वळवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात प्रत्येक वर्षाला तीन ते चार पिके घेता येणार आहेत. गोवा राज्यात सुमारे १८०० कोटी रुपयांची जलसिंचनाची कामे हाती घेण्यात आल्याचे माजी जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले.
दोडामार्गापासून मुख्य कालव्यात तिळारी पाणी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले आहे. प्रत्येक सेकंदाला सात क्‍युबीक मीटर पाणी कालव्यातून येत आहे.शिवोली येथे दोनशे मीटर मुख्य कालव्याचे काम पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच हणजूण कायसूव भागाकडे पाणी वळवण्यात येणार आहे.तसेच कळंगुट भागात पाणी वळवण्यात येणार आहे. पूर्ण क्षमतेने सर्व भागात पाणी सोडल्यानंतर हजारो हेक्‍टर जमीन पाण्याखाली येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी जलसिंचन खात्याकडे संपर्क साधून आपल्या भागातील समस्या जलसिंचन खात्याच्या कार्यालयात कळवाव्या. जलसिंचन विभागामध्ये अभियंते या समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

पेडणे तालुक्‍यात गॅम्‍बलिंग झोन नको
पांढरा हत्ती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जलसिंचन खात्याच्या योजनेच्या कामाला या वर्षी गती देण्यात आली आहे. दोडामार्ग ते शिवोलीपर्यंत कालव्यात पडलेला कचरा काढण्याचे काम पूर्ण केल्यानंतर कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. दोडामार्ग येथून कालव्यात सोडलेले पाणी डिचोली व पेडणे भागाकडे वळवण्यात आले आहे. तसेच शिवोली भागाकडे प्रायोगिक तत्त्वावर सोडण्यात आले आहे.सुमारे ३८ किलोमीटर लांबीच्या मुख्य कालव्यातील पाणी शेतामध्ये वळवण्यासाठी आधीच तयार केलेल्या सिमेंटच्या पाटामधून जवळपास असलेल्या गावातील शेतात पाणी वळवण्यात येणार आहे.

कालव्यातून जाणाऱ्या पाण्याची चाचणी होणार
मुख्य कालवा बांधून बरीच वर्षे झाल्यामुळे कालव्यातून जाणाऱ्या पाण्याची ठिकठिकाणी चाचणी करण्यात येणार आहे.कालव्यातून पाणी झिरपल्यास बंद करण्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.पेडणे, शिवोली, कोलवाळ, गिरी या गावात सिमेंटच्या पाटाद्वारे पाणी शेतात सोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सिमेंटचे पाट बांधण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी तयार केलेल्या पाटामध्ये अद्याप पाणी वळवण्यात आले नाही. मुख्य कालव्यातून ठिकठिकाणी गावातील शेतात पाणी वळवण्यासाठी मुख्य कालव्याला जोडण्यात आलेले लोखंडाचे वाल्व गंजून गेल्यामुळे काही ठिकाणी पाणी सोडण्यात आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com