मालपे येथे कारला आग लागून दोन लाखांची हानी

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

एम.एच. ०१ ए.आर. ५४११ या क्रमांकाच्या टाटा सुमो गाडीला आग लागण्याची घटना घडली.

पेडणे

मालपे येथे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंपपासून काही अंतरावर काल (२० रोजी) संध्याकाळी एम.एच. ०१ ए.आर. ५४११ या क्रमांकाच्या टाटा सुमो गाडीला आग लागण्याची घटना घडली. गाडीतील चालक व मालक कसलीही इजा न होता सुखरुप बचावले.
वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथील अविनाश शिरोडकर यांच्या मालकीची ही गाडी असून, चालक मुकुंदरावळे हे गाडी चालवत होते. गाडीला आग लागल्यावर प्रसंगावधान राखून दोघेही गाडीबाहेर सुरक्षीतरीत्या आले. यासंदर्भात पेडणे अग्निशामक दलाला माहिती मिळतात लगेचच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. या अपघातात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले तर पन्नास हजार रुपयांची मालमत्ता वाचविली.
हवालदार फटू नाईक, अग्निशामक दलाचे जवान प्रमोद गावकर, शेखर मयेकर, चालक रामदास परब यांनी आग आटोक्यात आणण्याचे काम केले. तांत्रिक दोषामुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या