कार्निव्हल मिरवणूक या शहरातून निघणार

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

फोंड्यात रविवारी कार्निव्हल महोत्सव

फोंड्यातील कार्निव्हल मिरवणूक आयोजित करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य न मिळाल्यास लोकाश्रयावर हा कार्निव्हल महोत्सव आयोजित केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

फोंडा : फोंड्यातील कार्निव्हल मिरवणूक रविवारी २३ रोजी निघणार आहे. यासंबंधीची माहिती फोंडा कार्निव्हल समितीचे सरचिटणीस आगुस्तिन फर्नांडिस यांनी दिली. यावेळी मिंगेल फर्नांडिस, मेरी रॉड्रिगीस, मारिया फर्नांडिस व समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फोंड्यात पूर्वी नाताळ समितीतर्फे कार्निव्हल मिरवणूक आयोजित केली जायची. पण विद्यमान आमदार आणि तत्कालीन गृहमंत्री रवी नाईक यांनी त्यानंतर सरकारी आर्थिक सहाय्य कार्निव्हल मिरवणूक आयोजित करण्यासाठी दिले, आणि त्यानंतर सरकारी पातळीवरील कार्निव्हल महोत्सव आयोजित केला जाऊ लागला. मिरवणुकीचे आयोजन व खर्च शासकीय पातळीवर फोंडा पालिकेच्या माध्यमातून केले जायचे.

आमदार रवी नाईक यांनी फोंड्यातील कार्निव्हल मिरवणुकीसंबंधी यंदा मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक सहाय्यासंबंधी विचारणा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दर्शवली होती, पण अजून सरकारी पातळीवर हालचाल झाली नसल्याने प्रसंगी फोंड्यातील कार्निव्हल महोत्सव लोकाश्रयावर केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

रविवारी दुपारी साडेतीन वाजता काझीवाडा - फोंडा येथून कार्निव्हल मिरवणूक निघणार आहे. तिस्क - फोंडा येथे या मिरवणुकीची सांगता होईल. या मिरवणुकीत सहभागी पथक व चित्ररथांसाठी स्पर्धा होणार नसून प्रत्येकाला मानधन दिले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

 

 

हे संमेलन होणार एप्रिलमध्‍ये

संबंधित बातम्या