भारतात कॅशच 'किंग', मात्र डिजिटल व्यवहार वाढले : रिझर्व्ह बॅंक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

देशात रोखीलाच प्राधान्य
रिझर्व्ह बॅंकेचा अहवाल; डिजिटल व्यवहारातही वाढ

एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत व्यवहारात असलेले चलनी नोटांचे मोठे प्रमाण हे आर्थिक व्यवहारांसाठी रोख रकमेचाच वापर होत असल्याचेच निदर्शक आहेत, असे या अभ्यास अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात अद्यापही बहुतांश व्यवहार रोखीनेच होत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्येही वाढ होत आहे, असे रिझर्व्ह बॅंकेच्या अभ्यास अहवालातून समोर आले आहे.

या निष्कर्षावर भारतात रोखीने होणाऱ्या व्यवहारांना अजूनही मोठे स्थान असल्याचे दिसते आहे, असे यात म्हटले आहे. ऑक्‍टोबर २०१४ ते ऑक्‍टोबर २०१६ या कालावधीत देशातील चलनी नोटांच्या वापरात १४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती.

ऑक्‍टोबर २०१९ मध्ये देशातील चलनी नोटांचा वापर २६ ट्रिलियन रुपयांवर पोचणे अपेक्षित होते मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण २२.३ ट्रिलियन रुपयांवर गेले. याचाच अर्थ देशात डिजिटल व्यवहार वाढत असून, रोख रकमेचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे.

एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रकमेत मागील पाच वर्षांत वाढ झाली आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. चलनी नोटांच्या वापरात जगात चीननंतर भारताचाच क्रमांक लागतो. मात्र, एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत काढण्यात येणाऱ्या रोख रकमेचे प्रमाण भारतात १७ टक्‍क्‍यांवर स्थिर आहे.

 

वॉरन बफे यांनी एवढे शेअर विकत घेतले.

 

संबंधित बातम्या