सर्वण, लाडफेतील काजूंना बोंडू

Dainik Gomantak
सोमवार, 13 जानेवारी 2020

डिचोली, 

डिचोली, 

प्रतिकूल हवामानामुळे यंदा काजू पिकावर परिणाम होण्याचा अजूनतरी धोका असला, तरी डिचोलीतील सर्वण, लाडफे आदी बागायतीत काही काजूच्या झाडांना बोंडू धरले आहेत. दरम्यान, थंडगार भागातील आणि मोसमापूर्वी आलेल्या काजूच्या मोहोरावर अगोदरच फळधारणा प्रक्रिया सुरू होत असते. ज्यास्त करून काजू कलमांना लवकर फळधारणा होते, असा दावा कृषीतज्ज्ञांचा आहे. उशिराने पडलेला पाऊस आणि अद्याप काजू पिकाला पोषक अशी थंडी पडत नाही आणि त्यातच अधूनमधून पडणाऱ्या धुक्‍यामुळे अद्याप काजू पिकासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले नाही. काजूच्या झाडांना मोहोर धरलेला असला, तरी असेच प्रतिकूल हवामान राहिल्यास हा मोहोर करपून काजूच्या बहरावर परिणाम होण्याची भीती आहे.

साफसफाईची कामे पूर्ण...
काजू पिकाच्या हंगामात काजू बागायतीत व्यवस्थित फिरून बोंडू वेचता यावेत, यासाठी दरवर्षी पिकाला प्रारंभ होण्यापूर्वी प्रत्येक काजूच्या झाडाखाली आणि सभोवतालची झुडपे कापून साफसफाई करण्याच्या कामाकडे बागायतदार लक्ष देतात. यावर्षी बहुतेक बागायतीतील ही कामे पूर्ण झाली आहेत. साफसफाई केल्याने पिकाच्यादृष्टीनेही त्याचा फायदा होत असतो, असे काजू बागायतदारांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या