काजू फेणीच्या क्षेत्रांचे पुढील महिन्यांत लिलाव

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पणजी: उत्पादन शुल्क खात्याकडून तारखा जाहीर
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २०२० च्या हंगामासाठी काजू फेणी निर्मितीसाठी क्षेत्रिय लिलाव करण्यात येणार आहेत.राज्यातील बाराही तालुक्यांतील लिलावांना ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.ही प्रक्रिया १३ तारखेपर्यंत चालणार आहे.

उत्पादन शुल्क खात्यातर्फे उत्तर गोव्यातील लिलाव स्वामी विवेकानंद हॉल, सहावा मजला, जुन्ता हाऊस, पणजी येथे आणि दक्षिण गोव्यातील लिलाव सासष्टीतील मडगावच्या रवींद्र भवनात होईल.येत्या ५ फेब्रुवारी रोजी उत्तर गोव्यातील पेडणे व सत्तरी तालुक्यांचे लिलाव होतील.त्यानंतर दि. ६ रोजी त्याच ठिकाणी तिसवाडी, बार्देश आणि डिचोली तालुक्यांतील काजू क्षेत्रांचा लिलाव होईल.पाच दिवसांनी दक्षिण गोव्यातील लिलावांना म्हणजे १२ रोजी सुरुवात होईल.त्यादिवशी मुरगाव, काणकोण आणि फोंडा या तालुक्यांचा, तर दि. १३ रोजी सासष्टी, केपे, सांगे/धारबांदोडा या तालुक्यांचे लिलाव होतील.

लिलावात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांना २७ ते ४ फेब्रुवारीदरम्यान शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याविषयी उत्पादन शुल्क खात्याने लिलावाची जाहिरातही जारी केली आहे.

देशात यूथ काँग्रेसची ‘एनआरयू’ मोहीम सुरू

संबंधित बातम्या