कचरा प्रकल्पास आग 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पणजी:येथील हिरा पेट्रोल पंपामागे असलेल्या कचरा प्रकल्पातील शेडमधील कचऱ्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागली.या ठिकाणी असणारा  वॉचमन त्याच्या घरातील व्यक्ती आजारी असल्याने मध्यरात्रीच निघून गेल्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नसल्यामुळे मनपा आयुक्त संजीत रॉड्रिस यांनी सांगितले.दुपारपर्यंत आग वीजवण्याचे काम सुरु होते.दरम्यान बायंगीनी येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पातील ढिगार्यालाही सोमवारी दुपारच्या सुमारास काही प्रमाणात आग लागली.अग्निशमन दलाने तात्काळ तिथे जाऊन आग वीजवली. 

हिरो पेट्रोल पंपामागे असलेल्या शेडमध्ये सुमारे ३० टॅन कचऱ्याची साठवणूक करण्यात आली होती कचऱ्याला आग लागल्यानंतर बाहेरील बाजूस असलेल्या कचऱ्यानेही पवत घेतला आणि त्यात शेडच्या बाजूने असलेला जेसीबी,प्लास्टिकचे क्रेट जाळून खाक झाले.त्याचबरोबर आगीमुळे शेडच्या  पत्र्याचेही मोठे नुकसान जाहले. 

"देशभरात गेल्‍या दहा वर्षात वाघांच्‍या ५०३ पेक्षा अधिक हत्‍या."
सकाळी सडे १० च्या सुमारास अग्निशमन दलाला कोळ आल्यानंतर सुरवातीला दलाने एक गाडी पाठवली .महापालिकेच्या त्यानॆरद्वारे या गाडयांना पाणीपुरवठा करण्यात आला या या आगीवर ६० हजार लिटर पाण्याचा फवार करण्यात आला.दरम्यान,आगीची माहिती समजल्यानंतर आयुक्त रॉड्रिस यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.आगीचे नेमके कारण काय हे माहित नसून,येथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाची सेवाही खासगी कंपनीकडून घेतली आहे.सुरक्षा रास्कची या कामात बेफिकीरी दिसून येत असून.आग कशामुळे लागली हे तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 
राज्यातील कचरा डेपोंना आग लागणे हे काही नवे नाही.सोनसोड्यातील कचरा अनेक दिवस धुमसत होता,त्यानंतर तळगाव पठारावरील कचरा काही दिवस धुमसत राहिला होता. 
 
"पाणी वाचवा ,जीवन फुलवा संदेश घेऊन शिक्षक दांपत्याचा देशभर प्रवास "

सुरक्षारक्षकांची जबानी नोंद  : पणजी महापालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी दिनेश नाईक हा सुरक्षा रक्षक रात्री एकटा ड्युटीवर होता.त्याच्या कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी असल्याचा मोबाईलवर फोन त्याला आला होता.रात्री दीडच्या सुमारास तो डिचोली येथील आपल्या घरी परतला.आजी आजारी असल्याचे तो ड्युटीवर परत आला नाही.त्याच्या अनुपस्थित पहाटेच्या या सुमारास प्रकल्पाच्या कचऱ्याला आग लागली.तो ड्युटीवर नसल्याने त्याच्या गायब होण्यामागे पणजी महापालिकेने संशय व्यक्त केला.चौकशीसाठी त्याला पणजी पोलिसांनी बोलावले असता तो आला.त्याने जबानीत रात्री दिस वाजल्यानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी ड्युटीवर नव्हतो,याची कबुली दिली आहे.

  • बायंगीनी कचरा प्रकल्पालाही आग 
  • पहाटेच्या सुमारास लागली आग 
  • दोन बंबाचा  वापर 
  • ६० हजार लिटर पाण्याचा वापर 
  • ३० टॅन कचऱ्याची शेडमध्ये साठवणूक 
  •  

  •  
  •  
  •  
  •  

संबंधित बातम्या