भारताचे बचतीचे प्रमाण 15 वर्षांच्या नीचांकीवर  

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

देशात बचतीचे प्रमाण घटले

मागील आर्थिक वर्षातील स्थिती; 15 वर्षांतील नीचांकी पातळीवर

केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. आधीच गुंतवणुकीचा अभाव आणि बाहेरून कर्जरूपाने भांडवल उभारण्यात येत असल्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असताना बचतीत घट झाल्याचा फटकाही देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे.

नवी दिल्ली : देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बचतीलाही बसला आहे. देशातील बचतीचे प्रमाण १५ वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरले आहे. नागरिकांकडून करण्यात येत असलेली घरगुती बचतही खालावली आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

विविध गृहोपयोगी वस्तू आणि प्रवासावरील खर्च वाढला असल्यामुळे नागरिकांची घरगुती बचत कमी झाली आहे. देशाच्या एकूण बचतीच्या ६० टक्के इतकी बचत नागरिकांच्या घरगुती बचतीद्वारे होते. मात्र, असे असतानाही ब्राझीलसारख्या इतर उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा भारतालाच प्राधान्य मिळत आहे. भारताला दीर्घकालीन शाश्‍वत विकास करायचा असेल, तर गुंतवणुकीचे प्रमाण वाढायला हवे. देशांतर्गत बचत खालावत असेल, तर भारत सरकारला परकी भांडवलाकडे वळावे लागेल, असे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताची एकूण बचत घटून एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) 30.1 टक्‍क्‍यांवर ती आली आहे. 2011-12 या आर्थिक वर्षात हेच प्रमाण 34.6 टक्के आणि 2007-08 या आर्थिक वर्षात 36 टक्के इतके होते. याआधीचे बचतीचे सर्वाधिक नीचांकी प्रमाण 2003-04 या आर्थिक वर्षात 29 टक्के इतके होते. "जीडीपी'च्या आकडेवारीनुसार देशातील घरगुती बचत 2011-12 मध्ये 23 टक्के होती. ती मागील आर्थिक वर्षात घटून 18 टक्‍क्‍यांवर आली आहे. घरगुती बचत घटल्यामुळे भारतीय कंपन्यांना परकी बाजारपेठांमधून अधिक निधी व कर्ज उभारावे लागणार आहे. त्यामुळे परकी कर्ज वाढून देशाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान कमकुवत होऊ शकते.

बॅंक ऑफ बडोदाचा परवाना रिझर्व्ह बॅंक रद्द करू शकते

जीडीपीच्या तुलनेत बचत
ब्राझील ः 16 टक्के
मेक्‍सिको ः 23 टक्के
फिलिपिन्स ः 14.2 टक्के
चीन ः 46 टक्के
 

 

संबंधित बातम्या