परिवर्तन करो ना’ स्‍पर्धात्‍मक उपक्रम ‘जीडीपी’तर्फे ‘कोविड’ लढ्यात सकारात्‍मक पाऊल

Dainik Gomantak
शनिवार, 25 एप्रिल 2020

परिवर्तन करो ना’ स्‍पर्धात्‍मक उपक्रम  ‘जीडीपी’तर्फे ‘कोविड’ लढ्यात सकारात्‍मक पाऊल

पणजी,

‘परिवर्तन करो ना’ ही स्पर्धासह इंटर्नशिप, असा आगळावेगळा उपक्रम असून कोरोना महामारीच्या काळात लोकांना अद्ययावत आणि उत्कृष्ट उपाययोजनांवर विचार करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘ग्रोथ आणि डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म’ (जीडीपी) संस्थेने याची सुरवात केली आहे. आतापर्यंत या उपक्रमात ५०जणांनी नोंदणी केली असून अजून बरेच लोक यात सहभागी होतील, असा विश्‍‍वास संस्‍थेने व्‍यक्‍त केला आहे.
‘कोविड -१९’ चा देशातील लोकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. आम्ही त्याचा परिणाम जैविक, मानसिक आणि आर्थिक घटकांमध्ये पाहू शकतो. त्याची तीव्रता रोगजनकांच्या मृत्यूच्या आणि विकृतीच्या दरावर आणि त्यास प्रसार होण्यास होणाऱ्या वेळेवर अवलंबून असते. म्हणूनच, तिन्ही परिणाम विचारात घेतल्यास स्पष्ट होते की, ‘कोविड -१९’ ने सामाजिक-आर्थिक असंतुलन निर्माण केले आहे. पण, त्याचे दुष्परिणाम सध्या जाणवणार नाहीत. त्यामुळे अशावेळी या परिस्थितीवर फक्त व्याख्यान करणे टाळून काहीतरी समाधानकारक उत्तर शोधण्याची गरज आहे’, असे व्यवस्थापकीय विश्वस्त किशोर शाह यांनी सांगितले.

उपक्रमाविषयी...
‘परिवर्तन करो ना’ या उपक्रमासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया १४ एप्रिल २०१५ (याच दिवसापासून स्पर्धेस सुरवात) पासून सुरू झाली असून १५ मे २०२० पर्यंत खुली आहे. १ ते १५ जून पर्यंत विजेत्यांचे नाव घोषित केले जाईल. प्रत्येक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट उपाय योजनेसाठी पदक आणि प्रमाणपत्रे त्यासोबत रोख बक्षीस देण्यात येईल. तसेच सहभागींना विविध कंपनीमध्ये इंटर्नशिप किंवा नोकरीभरतीसाठी प्रस्तुत केले जाईल. या उपक्रमात विविध संस्थांचे मुख्याध्यापक, व्यावसायिक, विद्यार्थी, आर्किटेक्ट, स्वयंसेवी संस्था गोव्यातून तसेच गोव्याबाहेर स्थायिक असलेल्या अनेक उत्सुकांनी सहभाग दर्शविला आहे.

स्‍पर्धेसाठी पात्रता
विद्यार्थी संस्था, संस्था, कॉर्पोरेट्स, बचत गट, सेवानिवृत्त नोकरीदार वर्ग आणि गृहिणींपर्यंत कोणीही या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. वैद्यकीय लढाऊ तत्परता (मेडिकल कॉमबेट रेडिनेस, सामाजिक/आर्थिक/सांस्कृतिक पर्यावरणीय पुनर्संचयित करणे (सोशो कल्चरल इकॉनॉमिक इकॉसिस्टम रेस्टॉरेशन, नवीन क्रियांची कल्पना करणे (एन्विसेज नीव्ह फॉर्म ऑफ ऑपरेशन्‍स), राज्यासाठी स्मार्ट आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, ( स्मार्ट डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टम फॉर द स्टेट) गोमंतकीय अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित - पुनर्संचयित करणे (रेविव्हीव्ह रिइंस्टोअर रिइनव्हेंट द गोवन इकॉनॉमी) या पाच वेगवेगळ्या प्रकारांमधून इच्छूक सहभाग घेऊ शकतात.

संबंधित बातम्या