बुद्धिबळ स्पर्धा २२ पासून

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

स्पर्धेसाठी ५० हजार रुपयांची रोख बक्षिसे प्रायोजित करण्यात आली आहेत. ही बक्षिसे पहिल्‍या वीस खेळाडूंना तसेच इतर वयोगटातील प्रत्येकी दोन मुलगे व दोन मुली खेळाडूंना दिली जातील.

फातोर्डा : बीपीएस स्पोर्टस क्लब व सालसेत तालुका चेस असोसिएशनने संयुक्तपणे आयोजित केलेली द्वितीय स्व. प्रेमलता ओमप्रकाश अग्रवाल अखिल गोवा खुली फिडे मानांकन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २२ व २३ फेब्रुवारी रोजी बीपीएस क्लब सभागृहात खेळविण्यात येणार आहे.

सालसेत तालुक्यातील उत्कृष्ट खेळाडूंनाही बक्षिसे दिली जातील, विजेत्याला रोख १० हजार, उपविजेत्याला रोख ७ हजार व तिसरे स्थान पटकावणाऱ्या खेळाडूला ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी ५०० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागतील. इच्छुकांनी आशिष केणी ९८२२१०१६४६ यांच्याकडे २० फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा.

स्पर्धा ९ फेऱ्यांची असून पहिली फेरी २२ रोजी संध्याकाळी ३ वाजता सुरू होईल.
स्पर्धेतील बक्षिसे उद्योगपती राकेश आग्रवल यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ प्रायोजित केली आहेत.

 

संबंधित बातम्या