बुद्धिबळ स्पर्धेत ऋत्विज परब विजेता

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

विजेत्या खेळाडूंसमवेत मान्यवर.

स्पर्धेत अपराजित राहताना परबने आठ डाव जिंकले व एक डाव अनिर्णित राहिला. त्याचे ९ पैकी ८.५ गुण झाले. आठ गुण मिळवलेल्या विवान सुनील बाळ्ळीकर यास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने शेवटच्या डावात मंदार लाड याचा पराभव केला.

फातोर्डा : सालसेत तालुका चेस असोसिएशन व बीपीएस स्पोर्टस् क्लब यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या स्व. प्रेमलता ओमप्रकाश अग्रवाल स्मृती अखिल गोवा फिडे रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम मानांकित ऋत्विज परबने विजेता होण्याचा मान मिळवला.

निरज सारिपल्ली (तिसरा), अनिरुद्ध भट (चौथा), गुंजल चोपडेकर (पाचवा) यांचे संयुक्तपणे प्रत्येकी ७.५ गुण झाले. सहा ते वीस क्रमांकासाठी शिवांक कुंकळयेकर, साईरुद्र नागवेकर, अस्मिता रे, देवेश आनंद नाईक, मंदार लाड, एथन वाझ, नेत्रा सावईकर, तेजस शेट वेर्णेकर, सानवी नाईक गावकर, हर्ष तेलंग, श्रीलक्ष्मी कामत, वेद नार्वेकर, ऋषिकेष परब, आलेक्स सिक्वेरा, एड्रिक वाझ यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी एकूण ५० हजार रुपयांची बक्षिसे प्रायोजित करण्यात आली होती.
इतर वैयक्तिक बक्षिसे - सागर शेट्टी (अमानांकित सर्वोत्तम खेळाडू), सुहास अस्नोडकर (५० वर्षांवरील सर्वोत्कृष्ट), शौर्या पेडणेकर (महिला सर्वोत्कृष्ट), साईजा गुणेश देसाई (सर्वोत्कृष्ट होतकरु खेळाडू).

इतर वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू - झेक नाथन परेरा, श्रीया शांभा (अं ५), शुभ बोरकर, सारस पोवार, जेन्सिना सिक्वेरा, श्रीशा पेडणेकर (अं ७), कनिष्क सागर सावंत, आरव चोपडेकर, सय्यद मेझाह, पुर्वी नायक (अं ९), अमानत अली, अथर्व सावळ, श्रीया पाटील, वालंका फर्नांडिस (अं ११), शिवांक कुंकळीकर, सुयश नाईक गावकर, वरदा देसाई, निधी गावडे (अं १३), जुगन रॉड्रिग्स, सिद्धिराज गावकर, पवित्रा नायक, हेमांगी पेडणेकर (अं-१५).

सर्वोत्कृष्ट सालसेत तालुका खेळाडू - अथर्व कातकर, रुबेन कुलासो, वरद प्रभू, साईराज नार्वेकर, आरव प्रभू गावकर, श्वेता सहकारी, सानी गावस, किमया बोरकर, जेनिका सिक्वेरा, रोशेल परेरा.
या स्पर्धेत ७२ फिडे मानांकित खेळाडू होते.

बक्षीस वितरण समारंभात सालसेत तालुका चेस असोसिएशनने भक्ती कुलकर्णी व अमेय अवदी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी रोख प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले.

शिवाय ऋत्विज परब, पुरुषोत्तम कंटक, रुबेन कुलासो, साईराज वेरेकर, सक्षम नाटेकर, एथन वाझ, आर्यन रायकर, विवान बाळ्ळीकर, श्रीया पाटील, दिया सावळ, जेनिका सिक्वेरा, साईजा गुणेश, श्वेता सहकारी, साईराज नार्वेकर, पुर्वी नायक, अथर्व सावळ, शौर्य पेडणेकर यांचा खास गौरव करण्यात आला. प्रशिक्षक संजय कवळेकर, प्रकाश विक्रम सिंग, निरज सारिपल्ली, नंदिनी सारिपल्ली यांचाही सत्कार करण्यात आला.

बक्षीस वितरण समारंभाला बीपीएस क्लबचे अध्यक्ष संतोष जॉर्ज, आशेष केणी, मांगिरीश कुंदे, ज्‍युस्तिन कॉस्ता, दामोदर जांबावलीकर, शरेंद्र नाईक स्वप्निल होबळे हे मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या