मुख्‍यमंत्र्यांनी फाईल मागविल्‍या

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पणजी:कारवाईच्‍या धास्‍तीने नदी परिवहन अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ : निष्‍पक्ष तपासाची अपेक्षा

पणजी:कारवाईच्‍या धास्‍तीने नदी परिवहन अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ : निष्‍पक्ष तपासाची अपेक्षा

नदी परिवहन खात्यात कशाप्रकारे घोटाळे झाले, त्याचे वृत्तांकन गेल्या सोमवारपासून ‘दैनिक गोमन्तक’ करीत आहे.या खात्यातील घोटाळा पुढे आल्यामुळे सध्या ‘दैनिक गोमन्तक’च्या बातम्यांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दुसरीकडे या घोटाळ्याशी जे अधिकारी आणि कर्मचारी जोडले आहेत, त्यांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाने या वृत्तमालिकेची दखल घेतली असून, नदी परिवहनच्या अधिकाऱ्यांकडून फाईल मागविल्या आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने जरी फाईल मागविल्या असल्या, तरी त्या उघडल्या जाव्यात आणि निष्पक्ष तपास होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

बंदर कप्‍तान खात्‍यातही खळबळ
नदी परिवहन खात्यात तिकीट घोटाळ्यापासून, कामावर न जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसून पगार देण्यापर्यंत कारनामे सुरू होते. त्याशिवाय फेरीबोटीच्या वाढीव दराविषयी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही.त्याशिवाय १ हजार १११ चौरस मीटर जेटी वापरणाऱ्या व्यावसायिकाकडून एक रुपयाही भाडे नदी परिवहन खाते घेत नाही.यावरून या खात्यातील अधिकाऱ्यांचे पाय आणि हात किती पाण्यात बुडालेले आहेत, हेच यावरून दिसून येत आहे.या वृत्तांमुळे नदी परिवहन खात्याबरोबर बंदर कप्तान खात्यातही खळबळ उडाली आहे.
या घोटाळ्यांशी संबंधित असलेले अधिकारी आणि कर्मचारी स्वतःला वाचविण्यासाठी अनेक उपाय शोधत आहेत. नदी परिवहन खात्यातील घोटाळ्यांविषयी केलेल्या वृत्तांची दखल घेत आमच्या असंख्य वाचकांनी ‘दैनिक गोमन्तक’च्या खंभीर भूमिकेचे स्वागतही आणि अभिनंदनही केले आहे.मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित सर्व कागपत्रे मागवून त्याची निष्पक्ष तपासणी करणे गरजेचे आहे.तरच या खात्यातील मोठे मासे जाळ्यात अडकतील, अशी शक्यता आहे.

बेकायदा लाकूड वाहतूकप्रकरणी कारवाई

 

संबंधित बातम्या