म्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा फसवणूक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

पणजीः कर्नाटकने अर्थसंकल्पामध्ये म्हादईसाठी पाचशे कोटींची तरतूद केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीला धाव घेतली. राज्यातील पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीर पंतप्रधानांऐवजी केंद्रीयमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी पुन्हा एकदा गोमंतकीयांची फसवणूक केली आहे, असा आरोप मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी करून येत्या १५ मार्चला म्हादईसंदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठविले जाणार असल्याची माहिती दिली.

पणजीतील मगो कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार ढवळीकर म्हणाले की, म्हादईप्रकरणाशी जलशक्ती, वीज, पर्यावरण, वन, जलसंपदा तसेच पाणीपुरवठा अशा खात्यांचा संबंध येतो. त्यामुळे एक - दोन केंद्रीयमंत्र्यांच्या भेटीत त्यांच्याकडून तोंडी आश्‍वासन घेऊन मुख्यमंत्री गोव्यात परतले व लोकांना पुन्हा एकदा खोटे आश्‍वासन देऊन फसवणूक केली आहे. म्हादई प्रश्‍न सोडविणे ज्या केंद्रीयमंत्र्यांच्या हातात नाही त्यांना भेटून उपयोग काय असा प्रश्‍न आमदार ढवळीकर यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांना गोमंतकीयांबाबत प्रेम असते, तर त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला दिलेले पत्र मागे घण्यास शर्थीचे प्रयत्न केले असते. मात्र, त्यात त्यांना रस नाही. केंद्रात जाऊन भेट घेतल्याचा बहाणा राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केला आहे व ही सत्यता आता उघड झाली आहे. ते कसलेच लेखी आश्‍वासन केंद्राकडून आणू शकले नाहीत, असे ढवळीकर म्हणाले.

म्हादईसंदर्भातची आतापर्यंतची माहिती पंतप्रधानांना मगोतर्फे पाठविली जाणार आहे. त्यात सर्व मुद्दे, दस्ताऐवज व छायाचित्रे असलेले लेखी पत्र १५ मार्चला त्यांच्या पंतप्रधान कार्यालयात पोहचविले जाणार आहे. त्याचबरोबर त्याच दिवशी त्यांच्या संकेतस्थळावरून हे पत्र पाठविले जाणार आहे. जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविली जाणार आहे ती त्यांना पाठविल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यांनाही दिली जाईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.

‘पडेल खासदारांनी ध्यानात ठेवावे’

मगोतर्फे १७ मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात आले आहेत. काँग्रेस व मगो स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहेत. मात्र, हरमल व खोला मतदारसंघात मगोने त्यांना पाठिंबा दिला आहे, तर कुर्टी, मांद्रे, चिंबल या मतदारसंघात मगोला त्यांचा पाठिंबा आहे. काही पडेल
खासदारांनी मगोविरोधात काही मतदारसंघात अपप्रचार सुरू केला आहे. मागील निवडणूक त्यांनी ध्यानात ठेवावी. भाजपला बहुमत मिळवण्यामध्ये मगोचा हात होता, असे मगो आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले.

संबंधित बातम्या