साय - फीचा दुसरा दिवस उत्‍साहात

Dainik Gomantak
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पणजी,
गोव्‍यामध्‍ये सध्‍या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्‍सव सुरू आहे. येथे भरेलेली प्रदर्शने तसेच कार्यशाळांना हजेरी लावण्‍यासाठी बालचमुने गर्दी केली. साय - फीच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात राकेश राव यांनी दिग्‍दर्शित केलेल्‍या द क्लायमेट चेंज या चित्रपटाने झाली. वैज्ञानिक आणि दिग्दर्शक यांना यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे त्यांना देण्यात आली. 

एसआरएफटीआयच्या संचालक डॉ देबमित्रा मित्रा यांनी यावेळी चित्रपट निर्मिती आणि करिअरच्‍या संधी या विषयावर माहिती दिली. यानंतर एनपीसीओआरचे डॉ. अविनाश कुमार यांनी ‘हवामान बदलाचे कारण व परिणाम’ या विषयावर उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. डॉ. रोहित श्रीवास्तव यांची ‘पोलर रीजनवर इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल क्लायमेट चेंज ऑन इम्पॅक्ट’ या संकल्‍पनेवर आधारित चर्चा केल्या.
सायन्स लर्निंग थ्रू टॉयज म्‍हणजे खेळण्‍यांच्‍या माध्‍यमातून विज्ञान हि कार्यशाळा आयआयएसईआर पुणे यांनी घेतली तर गोवा बिझिनेस स्कूल, गोवा विद्यापीठाच्या स्क्रॅच प्रोग्रामिंगसारख्या कार्यशाळा विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या.
कार्यशाळांव्यतिरिक्त, विविध पुरस्कारप्राप्त विज्ञान आधारित चित्रपटही मेकेनिझ पॅलेस, ईएसजी कॉम्प्लेक्स येथे प्रदर्शित करण्यात आले.
राष्‍ट्रीय तसेच आंतरराष्‍ट्रीय दर्जचो मिशन मंगल, अंतरिक्षन ९००० केएमपीएच जिओस्टॉर्म, एव्हरेस्ट, टर्मिनेटर डार्क फॅट हे चित्रपट दाखविण्‍यात आले तसेच यानंतर प्रश्‍‍नउत्तरांचे सत्रही घेण्‍यात आले. या विषयावर आज आयआरआरएस-इसरो सेंटर देहरादूनचे संचालक डॉ. प्रकाश चौहान, वैज्ञानिक डॉ. रमेश कुमार, नवी दिल्‍ली येथील विज्ञान प्रसार वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे, तंत्रज्ञान हस्तांतरण व सहयोग, बीएआरसीचे प्रमुख पद्मश्री डॉ. शरद काळे यांनीही यावेळी प्रश्‍‍न आणि उत्तररांचा सेशन घेतला. 
  
संबंधित बातम्या