दोन ‘एनजीओं’विरोधात मुलांचा छळ केल्याचा गुन्हा दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

दोन एनजीओविरोधात गुन्हा दाखल  

पणजी: मडगाव येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व ‘एनआरसी’ला विरोधात घेण्यात आलेल्या सभेवेळी मुलांचा समावेश केल्याप्रकरणी महिला पोलिस ठाण्यात ‘कौन्सिल फॉर सोशल जस्टीस अँड पीस’ (सीएसजेपी) व ‘नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईटस् ऑर्गनायझेशन’ (एनसीएचआरओ) या दोन बिगर सरकारी संस्थेविरोधात (एनजीओ) बाल कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मडगाव येथे २४ जानेवारीला या दोन्ही एनजीओतर्फे आयोजित केलेल्या या सभेसाठी अल्पवयीन मुलांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका पोलिसांनी या एनजीओच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध ठेवला आहे. या सभेत वक्त्यांनी भाषणे करताना मुलांच्या उपस्थितीत असभ्य भाषा वापरण्यात आली. ज्या कायद्याविरुद्ध ही सभा आयोजित करण्यात आली त्यावेळी या मुलांना आणून त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करण्याऐवजी त्यांचा मानसिकरित्या छळ करण्यात आल्याचा आरोप इमिडिओ पिन्हो यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.
 

संबंधित बातम्या